Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर पाठिंबा देताच सरकारकडून लगेच द्रमुकची मागणी मान्य, सुप्रिया सुळे आणि कानिमोझी आता..

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक लोकसभेच्या पटलावर लवकरच मांडलं जाणार आहे. या विधेयकाला द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळणार आहे. म्हणून सरकारने सुद्धा या दोन पक्षांची एक मागणी मान्य केली आहे.

Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयकावर पाठिंबा देताच सरकारकडून लगेच द्रमुकची मागणी मान्य,  सुप्रिया सुळे आणि कानिमोझी आता..
Kanimozi-Supriya Sule
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 28, 2026 | 7:12 PM

सध्या सगळ्या देशात डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पूनर्रचना विधेयकाची चर्चा आहे. नरेंद्र मोदी सरकारने यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. काही महिन्यांपूर्वी डिलिमिटेशन आणि महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक पडलं होतं. पण सरकारने आता हे विधेयक मंजूर करण्यासाठी पूर्ण व्यवस्थित व्यूहरचना केली आहे. मोदी सरकारकडे लोकसभेत बहुमत आहे. पण डिलिमिटेशन हे साधसूधं विधेयक नाही. हे विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी सरकारला विरोधी पक्षाच्या मदतीची सुद्धा गरज भासणार आहे. कारण त्यासाठी आवश्यक संख्याबळ महत्वाचं आहे. संख्याबळाचा हा आकडा गाठण्यासाठी सरकारला बरचं काही करावं लागलं आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीत फूट पडणं गरजेचं होतं. त्यात मोदी सरकारला यश आलं आहे.

महाराष्ट्रातून शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तामिळनाडूतून द्रमुक हे दोन मोठे पक्ष संसदेत मोदी सरकारला साथ देणार आहेत. त्याशिवाय ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचे 20 खासदार आहेत. उद्धव ठाकरे गटाचे फुटलेले सहाखासदार अशा पद्धतीने सरकारने बहुमतासाठी लागणारं आवश्यक संख्याबळ जवळपास गोळा केलं आहे. शरद पवार यांच्यावर काँग्रेस आणि ठाकरे बंधुंकडून जोरदार टीका सुरु आहे. शरद पवारांना आमच्यामुळे राज्यसभेची जागा मिळाली याची आठवण काँग्रेसने करुन दिलीय. राज ठाकरेंनी ‘मी आधीच म्हटलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं” अशी मार्मिक टिप्पणी केली आहे.

Loading...

⁠सुप्रिया सुळे कोणासोबत बसणार?

द्रमुक आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकावर साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने सुद्धा द्रमुकची एक मागणी मान्य केली आहे. लोकसभेत DMK खासदारांच्या बसण्याच्या जागेत बदल करण्यात आला आहे. परिसीमन विधेयकावरील विशेष अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे. ⁠इंडिया आघाडीपासून दूर बसण्यासाठी DMKने स्वतंत्र जागेची मागणी केली होती. DMK खासदार कनिमोझी यांनी यासंदर्भात मे महिन्यात पत्र लिहिलं होतं. या बदलामुळे समाजवादी पार्टी, NCP (शरद पवार गट), शिवसेना (UBT) आणि काँग्रेसच्या काही खासदारांच्या जागांमध्येही फेरबदल करण्यात आलेत. ⁠सुप्रिया सुळे या आता कनिमोझी यांच्यासोबत बसतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us