
India Post Drone Delivery : महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम अशा गडचिरोली ( Gadchiroli ) भागात पोहचण्यासाठी पोस्ट खात्याला अनेक काळापासून अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अशा नक्षली भागात पोस्ट खात्याच्या पत्रांची डिलीव्हरी आता ड्रोनने करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या भागात जनतेचा मोठा फायदा होणार आहे.
पोस्ट विभागाने भामरागड, वैरागड आणि सिरोंचा तालुक्यातील २७ दुरस्थ गावामध्ये ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरु करण्याची तयारी पूर्ण केली आहे. घनदाट जंगले आणि चांगला रस्ता नसल्याने या आदिवासी भागात डाक आणि आवश्यक सामान पोहचवण्यासाठी दोन-दोन दिवस लागत होते. परंतू आता पोस्ट विभागाचे लक्ष्य D+0 डिलीव्हरी’ म्हणजे त्याच दिवशी सेवा प्रदान करण्याचे आहे.
हा पायलट प्रोजेक्ट केवळ संचार क्रांतीच आणणार असे नव्हे तर दुर्गम क्षेत्रात जीवनाची गती आणि सरकारी सेवांची पोहच निर्णायक रुपाने बदलणार आहे. D+0 डिलिव्हरीचे लक्ष्य आता दुर्गम भागात त्याच दिवशी डिलिव्हरी करण्याचे आहे. या सेवेचे काम पाहणारे अधिकारी ललित बोरकर यांनी सांगितले की ड्रोन डिलीव्हरीने आता या गावापर्यंत मेडिकल किट, सरकारी दस्तावेज, वर्तमान पत्रे आणि अन्य आवश्यक वस्तू देखील पोहचवता येणार आहेत. यामुळे केवल संचार व्यवस्था आमुलाग्र बदलेल असे नव्हे तर दुर्गम भागातील जीवनाचा वेग वाढणार आहे. आणि सरकारी योजना गावागावात पोहचवणे शक्य होणार आहे.
या महत्वाकांक्षी योजनेला याच वर्षी मे महिन्यात हिरवा झेंडा दाखवला होता. त्यावेळी कर्जत ते माथेरान या दरम्यान एका ड्रोन ९ किलो वजनाचे पार्सल केवळ २० मिनिटात यशस्वीपणे पोहचवले होते. रस्ते मार्गाने येथे पोहचण्यासाठी सुमारे दोन तास लागतात. या यशस्वी पायलट ट्रायलनंतर ऑगस्टमध्ये चंद्रपूर पोस्ट खात्याने गडचिरोलीत याची सुरुवात करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर २७ दुर्गम खेड्यांची निवड करण्यात आली. ही ड्रोन सेवा दुर्गम खेड्यापाड्यात राहणाऱ्या लोकांचे जीवन सुविधाजनक बनवण्यास मदत करणार आहे. ड्रोन क्रांतीने लोकांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे. गडचिरोळीच्या २७ आदिवासी गावात याचा वापर होणार आहे. पावसाळ्यात अनेदा या भागातील संपर्क तुटतो तेव्हा ही योजना कामी येणार आहे.