विमान प्रवासात मास्क घाला नाही तर दंड भरायला तयार रहा; DGCA ची प्रवाशांना सक्त ताकीद

| Updated on: Aug 17, 2022 | 8:40 PM

विमानतळांवर कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांनुसार प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. कोव्हीड गाईडलाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून  दंड आकारला जाणार आहे. दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

विमान प्रवासात मास्क घाला नाही तर दंड भरायला तयार रहा; DGCA ची प्रवाशांना सक्त ताकीद
Follow us on

नवी दिल्ली : पुन्हा एकदा देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता विमान वाहतूक नियामक अर्थात DGCA ने हवाई प्रवाशांना(DGCA Instructions) मास्क बंधनकारक केले आहे. विमान प्रवासात(Air Travel) मास्क(Mask) घाला नाही तर दंड भरायला तयार रहा अशी सक्त ताकीदच DGCA ने प्रवाशांना दिली आहे. नागरी उड्डाण संचालनालयाने (DGCA) बुधवारी या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत. विमान प्रवासादरम्यान कोविड प्रोटोकॉलचे(Corona Rules) काटेकोरपणे पालन करण्याच्या प्रवाशांना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

विमानतळांवर कोरोना प्रोटोकॉलच्या नियमांनुसार प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. कोव्हीड गाईडलाईनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून  दंड आकारला जाणार आहे. दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे.

DGCA ने सर्व विमान कंपन्यांना प्रवासादरम्यान सर्व प्रवासी योग्य प्रकारे मास्क घालतात यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. ज्या प्लॅटफॉर्मवरून प्रवासी जातात त्या प्लॅटफॉर्मची स्वच्छता करणे आवश्यक करण्यात आले आहे. एखाद्या प्रवाशाने सूचनांचे पालन केले नाही, नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास, विमान कंपनी त्या प्रवाशाविरुद्ध कठोर कारवाई करु शकते.

काय आहेत DGCA चे निर्देश

विमान कंपन्यांना प्रवाशांनी संपूर्ण प्रवासात मास्क घातला आहे की नाही याची खात्री करावी लागेल. जर एखाद्या प्रवाशाने सूचनांचे पालन केले नाही तर एअरलाइन त्याच्यावर कठोर कारवाई करेल. बुधवारी देशात कोरोनाचे 9,062 नवीन रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4,42,86,256 वर पोहोचली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,05,058 वर आली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता DGCA ने कडक पावले उचलण्याची घोषणा केली आहे.

दिल्लीत कोरोनाची परिस्थिती

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.  रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे.  कोविड-19 च्या संसर्गामध्ये झालेली वाढ आणि रूग्णालयांमध्ये दाखल होणार्‍या रूग्णांची संख्या ही भीतीदायक नसली तरी, तज्ञांनी मास्क घालण्याची आणि इतर कोविड-योग्य वर्तनांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश दिले आहेत.