AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : बीसीसीआयची सेमी फायनलआधी मोठी घोषणा, रोहित-विराट खेळणार, कधी? जाणून घ्या

Indian Cricket Team : बीसीसीआयने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार सुरु असताना अफगाणिस्तनच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. जाणून घ्या.

Team India : बीसीसीआयची सेमी फायनलआधी मोठी घोषणा, रोहित-विराट खेळणार, कधी? जाणून घ्या
Virat Rohit And Shubman Gill Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Mar 02, 2026 | 12:31 PM
Share

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर मात केली. टीम इंडियाने विंडीजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडिया 5 मार्चला उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहचेल. मात्र उपांत्य फेरीतील या सामन्याआधी बीसीसीआयने सोमवारी अर्थात 2 मार्चला मोठी घोषणा केली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. बीसीसीआयने अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने केलेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार अफगाणिस्तान क्रिकेट टीम जून महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. अफगाणिस्तान या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 1 कसोटी सामना आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

या निमित्ताने उभयसंघात पहिल्यांदा एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. आतापर्यंत उभयसंघात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात मालिका खेळवण्यात आलेली नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा असणार आहे.

उभयसंघातील दुसराच कसोटी सामना

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 6 ते 10 जून दरम्यान चंडीगडमध्ये एकमेव टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील हा दुसराच कसोटी सामना असणार आहे.  याआधी दोन्ही संघात 2018 साली एकमेव आणि पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता.

अफगाणिस्तानचा भारत दौरा

रोहित-विराट खेळणार

तसेच अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिज निमित्ताने टीम इंडियाच्या चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी एक्शन मोडमध्ये दिसणार आहे. रोहित आणि विराट या दोघांनी टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तेव्हापासून दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे मॅचेसच खेळतात.

शुबमन गिल याच्याकडे नेतृत्व

दरम्यान अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेत शुबमन गिल हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. शुबमन गिल याच्याकडेच भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

एकमेव कसोटी सामना, 6 ते 10 जून, चंडीगड

एकदिवसीय मालिका

पहिला सामना, 14 जून, धर्मशाला

दुसरा सामना, 17 जून, लखनौ

तिसरा सामना, 20 जून, चेन्नई

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार