AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanju Samson : रोहित, विराट-धोनीला श्रेय, गंभीरला टोमणा;संजूचा डबल गेम! विजयानंतर म्हणाला…

Sanju Samson Post Match Presentation India vs West Indies Super 8 : संजू सॅमसन याने मनाचा मोठेपणा दाखवून विंडीज विरुद्ध केलेल्या विजयी खेळीबाबत भाष्य करताना रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या तिघांचा उल्लेख केला. जाणून घ्या तो काय म्हणाला?

Sanju Samson : रोहित, विराट-धोनीला श्रेय, गंभीरला टोमणा;संजूचा डबल गेम! विजयानंतर म्हणाला...
Sanju Samson Post Match IND vs WI Super 8Image Credit source: Social Media and Gareth Copley/Getty Images
| Updated on: Mar 02, 2026 | 8:48 AM
Share

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत करो या मरो अशा स्थितीतील सामन्यात जबरदस्त विजय मिळवला. टीम इंडियाने रविवारी 1 मार्चला इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 5 विकेट्सने सामना जिंकला. संजू सॅमसन याच्या निर्णायक आणि वादळी खेळीच्या जोरावर भारताने 196 धावांचं आव्हान कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण केलं. भारताचा हा सुपर 8 फेरीतील दुसरा आणि साखळी फेरीसह एकूण सहावा विजय ठरला. टीम इंडियाने यासह उपांत्य फेरीतील विजय सुनिश्चित केला. भारताला जिंकवण्यात प्रमुख योगदान देणारा संजू सॅमसन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. संजूने या सामन्यानंतर मन मोकळं केलं. संजूने या खेळीबाबत भाष्य केलं.

संजूने त्याच्या खेळीबाबत बोलताने भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांची नावं घेतली. तसेच संजूने हेड कोच गौतम गंभीर याचं नाव न घेता त्याला टोला लगावला. संजूने अशाप्रकारे 1 दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. संजूने नक्की काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

संजूची विजयी खेळी

संजूने वेस्ट इंडिज विरुद्ध 196 धावांचा पाठलाग करताना नाबाद 97 धावांची खेळी केली. संजूने विजयानंतर त्याच्या खेळीचं गुपित उघडलं. संजूने मनाचा मोठेपणा दाखवत त्याच्या या खेळीचं श्रेय रोहित आणि विराटला दिलं. जे काही केलंय ते रोहित आणि विराटला पाहून शिकलोय, असं संजूने सांगितंल.

संजूने काय म्हटलं?

मी विराट कोहली आणि रोहित शर्मा यासारख्या दिग्गज खेळाडूंना खेळताना पाहिलंय. मी त्यांना त्यांची भूमिका बजावताना पाहिलंय. मी टीम इंडियासाठी 60 सामने खळलोय. मात्र रोहित आणि विराटला 100 सामने खेळताना पाहिलंय”, असं म्हणत संजू सॅमसन याने या 2 दिग्ग्जांना त्याच्या खेळीचं श्रेय दिलं. संजूने यासह आपल्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये फारशी संधी मिळत नाही असं अप्रत्यक्ष सांगत गंभीरवर निशाणा साधल्याचीही चर्चा क्रीडा वर्तुळात पाहायला मिळत आहे.

“मी रोहित, विराट आणि धोनी यांना पाहून चोख कामगिरी कशी करायची हे शिकलो आहे. त्यांना पाहून माझ्या अनुभवात वाढ झालीय”, असंही संजूने म्हटलं. माणूस निरीक्षणातून आणि प्रत्येक गोष्टीतून काही न काही शिकत असतो, हेच संजूच्या बोलण्यावरुन सिद्ध होतं.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार