AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय पवार यांच्या नंतर युगेंद्र पवार ही मैदानात! थेट पोस्ट करत केली मोठी मागणी, पवार कुटुंब एकवटलं?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघता प्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. अजित पवार यांचा मुलगा जय पवार नंतर आता पुतण्या युगेंद्र पवार यांनी देखील पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन पवार कुटुंबीय एकवटले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

जय पवार यांच्या नंतर युगेंद्र पवार ही मैदानात! थेट पोस्ट करत केली मोठी मागणी, पवार कुटुंब एकवटलं?
Yugendra PawarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 02, 2026 | 12:32 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अघतात मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जात असताना हा अपघात झाला. बरामती विमानतळावर लँडिंग करताना पहिले विमान एका झाडावर अपटले आणि नंतर खाली कोसळले अशी प्राथमिक माहिती DGCAच्या अहवालातून देण्यात आली आहे. त्यानंतर आता अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून पवार कुटुंबीय या कठीण काळात एकवटलं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काय आहे व्हिडीओ?

युगेंद्र पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्याचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह चक्क झोपलेला दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत युगेंद्र पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप

युगेंद्र पवार यांनी व्हिडीओ शेअर करत, “या व्हिडिओ मध्ये VSR कंपनीचे मालक रोहित सिंह हे स्वतः पायलट सीटवर बसून विमान सुरू असताना झोपलेले दिसत आहेत. हे अतिशय गंभीर असून यातून प्रवाशांच्या सुरक्षाबाबतचा निष्काळजीपणा समोर येत आहे. हा व्हिडिओ माझे बंधू जय पवार यांनी समोर आणला असून यातून VSR कंपनीचा मोठा हलगर्जीपणा स्पष्टपणे समोर येत आहे. केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी करावी, या कंपनीची सर्व विमान उड्डाणे तत्काळ स्थगित करावीत तसेच कंपनीचे मालक व सर्व संचालकांवर त्वरित गुन्हे दाखल करावेत, ही आमची सर्वांची ठाम मागणी आहे” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

जय पवार काय म्हणाले?

हा व्हिडीओ अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो — या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही एका मुलाची आर्त हाक आहे… माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी” असे म्हटले आहे.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....