AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs RCB Live Streaming : गुजरात-बंगळुरु आमनेसामने, शुबमनसेना विराटच्या टीमला पराभूत करणार?

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 Live Scorecard : गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. जाणून घ्या दोन्ही संघांतील हेड टु हेड रेकॉर्ड्स.

GT vs RCB Live Streaming : गुजरात-बंगळुरु आमनेसामने, शुबमनसेना विराटच्या टीमला पराभूत करणार?
Shubman Gill and Virat Kohli GT vs RCBImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 30, 2026 | 6:01 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 42 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. गुजरात विरुद्ध बंगळुरु यांच्यातील हा सामना 30 एप्रिलला होणार आहे.  गुजरात आणि बंगळुरु दोन्ही संघांची या मोसमात एकमेकांविरुद्ध आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी उभयसंघात 6 दिवसांआधी सामना झाला होता. बंगळुरु विरुद्ध गुजरात यांच्यात 24 एप्रिलला सामना झाला होता. त्या सामन्यात आरसीबीने गुजरातवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता गुजरातकडे घरच्या मैदानात सामना जिंकून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. उभयसंघातील 30 एप्रिल रोजीचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे गुजरात सामना जिंकून आरसीबीचा हिशोब करणार की गतविजेता संघ शुबमनेसेनेला दुसऱ्यांदा पराभूत करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यात रजत पाटीदार आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

गुजरात आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा नववा सामना असणार आहे. गुजरातने आतापर्यंत 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. गुजरात 8 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर आरसीबीने 8 पैकी 6 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं आहे. आरसीबी 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना कधी?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना गुरुवारी 30 एप्रिलला होणार आहे.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना कुठे?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

गुजरात विरुद्ध बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

दोघांपैकी वरचढ कोण?

गुजरात विरुद्ध बंगळुरु यांच्यात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. आरसीबीने या 7 पैकी सर्वाधिक 4 सामने जिंकले आहेत. तर गुजरातने आरसीबी विरुद्ध 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता उभयसंघात होणाऱ्या आठव्या सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है