AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBM 6: रुचिता-राखी यांना पिळून काढणार..; ‘बिग बॉस मराठी’च्या घरात 3 वाइल्ड कार्ड एण्ट्री पाहताच भन्नाट प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात यंदा एक नाही, दोन नाही तर तब्बल तीन वाइल्ड कार्ड एण्ट्रीज झाल्या आहेत. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके या तिघांनी बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आहे.

BBM 6: रुचिता-राखी यांना पिळून काढणार..; 'बिग बॉस मराठी'च्या घरात 3 वाइल्ड कार्ड एण्ट्री पाहताच भन्नाट प्रतिक्रिया
रेवा कौरासे, संकेत पाठक, संस्कृती साळुंकेImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 02, 2026 | 12:29 PM
Share

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरातून रोशन भजनकर बाहेर पडला. रोशनच्या एक्झिटनंतर खेळात जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कारण बिग बॉसच्या घरातील सदस्यांना या सिझनचा सर्वांत मोठा धक्का मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात अभिजीत बिचुकलेची वाइल्ड कार्ड एण्ट्री होणार, अशी जोरदार चर्चा होती. परंतु त्याच्या जागी एक नव्हे तर तीन-तीन वाइल्ड कार्ड एण्ट्रीज झाल्या. यामध्ये संकेत पाठक, संस्कृती साळुंके आणि रेवा कौरासे यांचा समावेश होता. या तिघांच्या एण्ट्रीनंतर बिग बॉस मराठीचा खेळ आणखी रंजक झाला असून प्रेक्षकांच्या विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

रेवा कौरासे ही हिंदी मालिकांमध्ये झळकली होती. ती आता बिग बॉस मराठीच्या घरात स्वत:ची वेगळी छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. तर ‘लग्नाची बेडी’ या मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता संकेत पाठक बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर स्वत:चं नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. संस्कृती साळुंकेनं विविध रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला होता. या तिघांच्या एण्ट्रीने बिग बॉसच्या घरातील समीकरणं बदलली आहेत.

तिघांच्या वाइल्ड कार्ड एण्ट्रीवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अखेर बिग बॉसच्या घरात इंडस्ट्रीमधला आणखी एक ओळखीचा चेहरा दिसला. नाहीतर रुचिताच्या भाषेत खरकटे लोक आणले आहेत’, असं संकेतबद्दल एकाने लिहिलंय. तर ‘रुचिताने आल्या आल्या याची जिरवली’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अभिजीत बिचुकलेला तरी आणायला पाहिजे होतं’, अशी कमेंट एका युजरने केली. रुचिता आणि राखी यांना पिळून काढणार.. अशाही प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

‘भाऊचा धक्का’मध्ये सूत्रसंचालक रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केली आहे. काही स्पर्धकांचं कौतुक करत त्याने खेळाचं समर्थन केलंय, तर रुचितासमोर त्याने आपलं परखड मत मांडलंय. बिग बॉसच्या घरात गटबाजी करणाऱ्या सदस्यांना त्याने ठाम शब्दांत सल्ला दिला आहे. रितेशसमोर जेव्हा प्राजक्ताने तन्वीबद्दल आपलं मत मांडलं, तेव्हा त्याने चोख उत्तर देत तन्वीला मोलाचा सल्लाही दिला. आता आगामी एपिसोड्समध्ये काय घडणार, कोण नॉमिनेशनमध्ये जाणार आणि कोण सुरक्षित होणार, घराचा नवीन कॅप्टन कोण होणार, हे सर्व पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार