AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi CCS Meeting : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींची हाय लेव्हल बैठक, त्यानंतर पहिल्यांदाच डायरेक्ट घेतली अशी भूमिका

PM Modi CCS Meeting : या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले. पीएम मोदींनी बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती. आखाती देशांमध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात या बैठकीत माहिती देण्यात आली.

PM Modi CCS Meeting : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींची हाय लेव्हल बैठक, त्यानंतर पहिल्यांदाच डायरेक्ट घेतली अशी भूमिका
PM Modi CCS Meeting
| Updated on: Mar 02, 2026 | 12:20 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर रात्री जवळपास 9.30 वाजता दिल्लीत पोहोचले. त्यांनी UAE च्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी CCS ची बैठक बोलावली. UAE चे अध्यक्ष आणि माझे बंधु भाई शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी मी चर्चा केली असं मोदींनी सांगितलं. त्यांनी UAE वर झालेल्या हल्ल्याची निंदा केली. जिवीत व वित्तहानी झाली त्यावर दु:ख व्यक्त केलं. भारत या कठीण काळात यूएई सोबत भक्कपणे उभा आहे, असं मोदींनी सांगितलं. ते इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत सुद्धा बोलले. चालू असलेल्या युद्धात भारताची भूमिका तटस्थतेची आहे. पण पहिल्यांदाच पीएम मोदींनी इराणचा निषेध केला. ही सुद्धा बाब महत्वाची आहे.

पीएम मोदींनी रविवारी रात्री दिल्लीत परतल्यानंतर इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटीची (CCS) बैठक बोलावली. अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माहिती घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले. पीएम मोदींनी बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

बैठकीत काय निर्देश दिले?

आखाती देशांमध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात या बैठकीत माहिती देण्यात आली. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्याला आहेत. भारतीय प्रवासी समुदायाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. आखातामधील सुरक्षा स्थिती त्याचसोबत व्यापारी, आर्थिक परिणाम होणार त्यावर विचार करण्यात आला. सीसीएसने सर्व संबंधित विभागांना या घटनांमुळे प्रभावित होणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक, व्यवहार्य पावलं उचलण्याचे निर्देश दिले.

आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या किती?

इराणने होर्मुज स्ट्रेट बंद केल्यामुळे तिथे कशा प्रकारची परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यात आली. हा स्ट्रेट भारताच्या तेल जहाजांसाठी महत्वाचा रस्ता आहे. इराणमध्ये 10 हजार भारतीय नागरिक राहतात. इस्रायलमध्ये 40 हजार तर खाडी देश आणि पश्चिम आशियात राहणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास 90 लाखाच्या घरात आहे. भारताने याआधी युद्धाच्यावेळी पश्चिम आशियासह वेगवेगळ्या देशातून भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. भारतीय दूतावास आपल्या नागरिकांच्या संपर्कात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...