प्रियांका गांधींचे ते विधान म्हणजे अज्ञानाचेच उदाहरण, धर्मेंद्र प्रधान यांची सडकून टीका!

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारच्या एनईपी आणि पीएम-श्री योजनेवर टीका केली. त्यांच्या याच टीकेला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

प्रियांका गांधींचे ते विधान म्हणजे अज्ञानाचेच उदाहरण, धर्मेंद्र प्रधान यांची सडकून टीका!
pryanka gandhi and dharmendra pradhan
| Updated on: Oct 30, 2025 | 10:02 PM

Dharmendra Pradhan : काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांगा कांधी वॉड्रा केंद्र सरकारवर नेहमीच टीका करताना दिसतात. यावेळी त्यांनी एका कार्यक्रमात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर बोट ठेवले. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून मुलांचा ब्रेनवॉश केला जातोय, असा आरोप केला. तसेच मुलांची केवळ एकाच विचारधारेच्या अनुकूल मानसिकता कशी होईल, हाच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पीएम श्री स्कुल यासारख्या योजनांच्या उद्देश आहे, असा दावा केला. प्रियांका गांधी यांच्या याच दाव्याला आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी प्रियांका गांधी यांचे हे विधान म्हणजे शिक्षक, शिक्षणतज्ज्ञांचा अवमान आहे, असा पलटवार केला आहे.

धर्मेंद्र प्रधान नेमकं काय म्हणाले?

प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर केलेले हे विधान म्हणजे अज्ञान आणि राजकीय संधीसाधूपणाचे उदाहरण आहे. पीएम-श्री स्कुल योजनेबात प्रियांका गांधी चुकीची माहिती पसरव आहे, असा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे.
तसेच प्रियांका गांधी यांनी शिक्षण आणि शिक्षणतज्ज्ञांचा अपमान केला आहे. त्यांनी तत्थ्यांना मोडून-तोडून त्यांच्या सोईनुसार पुढे आणले आहे. तर पीएम-श्री योजनेवरील त्यांचे विधान हे बेजबाबदारपणाचे आहे. त्यांचे विधान दिशाभूल करणारे आणि अपमानास्पद आहे, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले. गेल्या 30 वर्षांपासून देश अशा चांगल्या शैक्षणिक सुधारणांची वाटप पाहात होता. 21 व्या शतकातील आव्हांना तोंड देण्यासाठी विद्यार्थी तयार असावेत, अशा सुधारणांची प्रतीक्षा केली जात होती, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले.

प्रियांका गांधी नेमकं काय म्हणाल्या होत्या?

प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 आणि प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया (पीएम श्री) या दोन योजनांवर भाष्य केले. “सरकारच्या या योजना विद्यार्थी तसेच शिक्षणासाठी पुरक आहेत, असे मला वाटत नाही. मुलांचा दृष्टीकोन व्यापक झाला पाहिजे. वेगवेगळ्या विचारधारा असतील तर त्या सर्वच विचारधारांचा अभ्यास व्हायला हवा. मुलांना शिक्षित केलं पहिजे. ते जागरुक झाले पाहिजेत. मात्र ही जागरुकता फक्त एकाच दिशेने नसावी. त्यामुळेच आमचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पीएम-श्री योजनेला विरोध आहे,” असे प्रियांका गांधी म्हणाल्या.