Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इन्स्टाग्राम खाते बंद केले आहे. सध्याच्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांच्या मुलीवर टीका केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना तिने आपले खाते बंद करण्याचा निर्णय घेतला.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!
dharmendra pradhan and nimisha pradhan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 22, 2026 | 8:48 PM

Naimisha Pradhan : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. नीट पेपरफुटी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सीजेपीने केली आहे. याच मागणीला घेऊन देशभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. देशातील शिक्षणव्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी हे आंदोल सुरू आहे. एकीकडे हे आंदोलन सुरू असतानाच अचानक धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्या परदेशात कायद्याचे शिक्षण घेतल्याने त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. याच ट्रोलिंगमुळे आता निमिषा प्रधान यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

निमिषा प्रधान यांनी इन्स्टाग्राम खातं केलं बंद

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इन्स्टाग्राम खाते बंद केले आहे. सध्याच्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांच्या मुलीवर टीका केली जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना तिने आपले खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना ट्रोल केलं जात होतं.

निमिषा प्रधान सध्या परदेशात काय करतात?

धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधान या  मॅसाचुसेट्स येथे कायद्याचे शिक्षण घेत आहेत. 2023 सालापासून त्या अमेरिकेतच आहे. निमिषा सध्या  सध्या यूएस इंडिया स्टेटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये सिनिअर असोसिएट म्हणून काम करत आहेत.

दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय?

दुसरीकडे सीजेपीच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. सरकारने विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज तसेच नीट पेपर फुटीचा मुद्दा यावर संसदेत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच दुसरीकडे सीजेपीच्या प्रतिनिधींशीही सरकारची चर्चा सुरू आहे. सरकारने अद्याप धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. काँग्रेस पक्षानेही प्रधान यांचा राजीनामा मागितला आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफी मागावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचेही राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यामुळे सीजेपीच्या कोणत्या मागण्या सरकार मान्य करणार तसेच सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळणार का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us