AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संपादकीय बदल करण्यास नकार दिल्याने ‘पेंग्विन’ने माघार घेतली का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्राबाबत प्रकाशकाचा अखेर मोठा खुलासा

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या "बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह" या पुस्तकासंदर्भात नवा वाद समोर आला आहे. त्यानंतर यावर प्रकाशकाकडून खुलासा देखील करण्यात आला.

संपादकीय बदल करण्यास नकार दिल्याने 'पेंग्विन'ने माघार घेतली का? सोनिया गांधींच्या आत्मचरित्राबाबत प्रकाशकाचा अखेर मोठा खुलासा
Sonia GandhiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 6:23 PM
Share

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या “बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह” या पुस्तकासंदर्भात नवा वाद समोर आला आहे. पेंगुइन रँडम हाऊस इंडियाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आलं आहे की, ते भारतामध्ये या पुस्तकाचे प्रकाशक नाहीयेत. काही आठवड्यांपूर्वीच अमेरिकन प्रकाशक असलेले अल्फ्रेड ए नॉफ यांनी अशी घोषणा केली होती की, हे पुस्तक दहा नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. मात्र एका मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार सोनिया गांधी यांनी या पुस्तकामध्ये बदल करण्यास मनाई केल्यामुळे प्रकाशकांनी हे पुस्तक छापण्यास नकार दिला. याच दाव्याचा खुलासा करताना पेंगुइन रँडम हाऊस इंडियाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आलं आहे की, ते भारतामध्ये या पुस्तकाचे प्रकाशक नाहीयेत. तसेच त्यांनी रिपोर्टमध्ये करण्यात आलेला दावा देखील फेटाळून लावला आहे.

आम्ही हे पुस्तक छापण्यासाठी सुरुवातीपासूनच उत्सुक आहोत. तसेच हे पुस्तक छापण्यासाठी आम्ही तयार देखील आहोत. लेखकांच्या तथ्यांची पडताळणी करणं आणि त्यांना गरज वाटल्यास काही सल्ला देणं हा प्रकाशन प्रक्रियेचा एक सामान्य भाग आहे. ज्याचे अधिकार हे प्रकाशन संस्थेकडे असतात, तसेच ती त्यांची जबाबदारी देखील आहे. मात्र भारतामध्ये या पुस्तकाचं वितरण कोण करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये, असं स्पष्टीकरण यावर पेंगुइन रँडम हाऊस इंडियाच्या वतीने देण्यात आलं आहे. मात्र दुसरीकडे ऑनलाईन शॉपिंग साइट असलेल्या अमेझॉनवर या पुस्तकाची ईबुक 2,615 रुपयांमध्ये प्री- ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. विलियम कॉलिंस नावाच्या प्रकाशकाने हे पुस्तक छापल्याचा दावा अमेझॉनच्या वतीने करण्यात आला आहे. तर दुसरीकडे अल्फ्रेड ए नॉफ यांच्याकडून देखील या पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख घोषीत करण्यात आली आहे.

या पुस्तकामध्ये सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यातील घटना मांडल्या आहेत. या पुस्तकामध्ये सोनिया गांधी यांचं बालपण ते त्यांचा राजकीय प्रवास अशा सर्व गोष्टी वाचायला मिळणार आहेत. इटली ते भारत हा प्रवास कसा झाला? याबद्दल देखील या पुस्तकामध्ये माहिती आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान