AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Christmas Day 2023 : शाळेत मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवू नका अन्यथा कारवाई, कुणी काढले फर्मान?

Christmas Day 2023 : खासगी शाळांनी नाताळ सणावेळी सांताक्लॉजच्या वेशभूषा विद्यार्थ्यांना परिधान करण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल, असे निर्देश देणारे पत्र सर्व अशासकीय संस्थांना शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.

Christmas Day 2023 : शाळेत मुलांना 'सांताक्लॉज' बनवू नका अन्यथा कारवाई, कुणी काढले फर्मान?
Christmas Day 2023Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Dec 19, 2023 | 11:07 PM
Share

भोपाळ | 19 डिसेंबर 2023 : येत्या 25 डिसेंबरला येणार्‍या ख्रिसमस सणाआधी राज्यसरकारने शाळांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ख्रिश्चन सणांच्या निमित्ताने अनेक शाळांमधून विद्यार्थांना सांताक्लॉजचा पोशाख घालण्यात येतो. मात्र, हा पोशाख घालण्याआधी खासगी शाळांनी पालकांची लेखी परवानगी घ्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. कुटुंबाची परवानगी न घेता मुलांना असा पोशाख घातल्यास शाळांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.

नाताळ सणाच्या निमित्ताने शाळांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी सांताक्लॉजची वेशभूषा करतात. मात्र, मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात शालेय शिक्षण विभागाने नवीन फर्मान जारी केले आहे. यानुसार खासगी शाळांनी नाताळ सणावेळी सांताक्लॉजच्या वेशभूषा विद्यार्थ्यांना परिधान करण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी घ्यावी लागेल, असे निर्देश देणारे पत्र सर्व अशासकीय संस्थांना दिले आहे.

जिल्हा शिक्षणाधिकारी विवेक दुबे यांच्या नावाने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशात असे म्हटले आहे की, कोणत्याही शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मुलाला सांताक्लॉजच्या वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी करू घेऊ नये. तसे आढळून आल्यास संबंधित शाळेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

शिक्षण विभागाचे हे पत्र जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांना देण्यात आले आहे. मुलांना कार्यक्रमात विशेष सणासुदीचा पोशाख घालण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे अप्रिय परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे हा आदेश जारी करण्यात आला आहे, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

दरम्यान, एकीकडे जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असताना विश्व हिंदू परिषदेनेही याबाबत शाळांना एक पत्र लिहिले आहे. भोपाळमधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये हिंदू मुलांना त्यांच्या शाळांमध्ये सांताक्लॉज बनवू नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

या पत्रात विहिंपने म्हटले आहे की. मध्य भारत प्रांतातील सर्व शाळांमध्ये सनातन हिंदू धर्म आणि परंपरा मानणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत आयोजित ख्रिसमस कार्यक्रमात सांताक्लॉज बनवले जात आहे. ख्रिसमस ट्री आणण्यास सांगितले जात आहे. हा आपल्या हिंदू संस्कृतीवरचा हल्ला आहे. हिंदू मुलांना ख्रिश्चन धर्माची प्रेरणा देण्याचा हा डाव आहे. असे कपडे किंवा झाडे आणून पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे असे यात म्हटले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?