ब्रेन हॅमरेज ते लॅब रिपोर्ट, वैद्यकीय क्षेत्रात एआयचा उपयोग कसा होऊ शकतो, डॉ. संगीता रेड्डी यांनी सगळं सांगितलं!

डॉ. संगीता रेड्डी यांनी वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबद्दल आपले मत मांडले. एआयचा योग्य वापर केल्यास रुग्णावर वेळेत उपचार होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ब्रेन हॅमरेज ते लॅब रिपोर्ट, वैद्यकीय क्षेत्रात एआयचा उपयोग कसा होऊ शकतो, डॉ. संगीता रेड्डी यांनी सगळं सांगितलं!
doctor sangita reddy
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 08, 2026 | 7:35 PM

AI Use In Medical Field : सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने आज सर्वच क्षेत्रात प्रगती झालेली आहे. कृत्रीम बुद्धमत्ता अर्थात एआयच्या मदतीने तर जवळजवळ प्रत्येक क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला असून कमी मनुष्यबळ असताना तुलनेने अधिक चांगले काम करता येत आहे. वैद्यकीय क्षेत्रदेखील यात मागे नाही. आजकाल रुग्णांवर उपचार करण्यासाठी एआयचा वापर चालू झाला आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळ्या पातळ्यांवर एआयच्या वापराचा विस्तार होतच राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात एआयच्या वापरामुळे नेमका काय बदल होईल? रुग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा यात नेमका कोणत्या ठिकाणी असेल, यावर डॉ. संगीता रेड्डी यांनी विस्तृत भाष्य केले आहे. त्या अपोलो हॉस्पिटलच्या सह व्यवस्थापकीय संचालक आहेत.

वेळेची बचत होऊ शकते

डॉक्टर संगीता रेड्डी यांनी 13 व्या अपोलो इंटरनॅशनल मेडिकल डायलॉगमध्ये न्यूज 9 ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एआयच्या मदतीने रुग्णाला नेमका कोणता त्रा आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो. तसेच हा आजारामुळे होणारी हानी वेळीच टाळता येऊ शकते, असे मत संगीता रेड्डी यांनी व्यक्त केले. तसेच एखाद्या रुग्णाच्या लॅप चाचणी रिपोर्टमध्ये धोकादायक लक्षणे आढळून आल्यास एआय या सर्व लक्षणांचा अभ्यास करेल. त्यानंतर लगेच एआयच्या मदतीने ताबडतोब संबंधित डॉक्टरांच्या फोनवर तसा मसेज जाईल, अशी माहिती संगीता रेड्डी यांनी दिली.

ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांत एआयची मोठी मदत

एआयच्या मदतीने ताबडतोब संदेश पाठवल्यामुळे उपचारासाठी लागणारा उशीर टाळता येऊ शकतो. यामुळे एखाद्या रुग्णाला गंभीर आजार असेल तर त्यापासून त्याला वाचवता येऊ शकते. ब्रेन हॅमरेजचा शोध सीटी स्कॅनच्या मदतीने घेतला जातो. ब्रेन हॅमरेज या आजारात एआयच्या मदतीने नेमकी अडचण लवकर सोधता येऊ शकते. यामुळे रुग्णाच्या उपचाराठी अमूल्य असलेला वेळ वाचवता येऊ शकतो, असेही मत संगीता रेड्डी यांनी व्यक्त केले.

हिलिंग इंडिया नावाची संकल्पना मांडली

पुढे बोलताना त्यांनी भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारत जगाचे नेतृत्त्व करू शकतो, असे त्यांनी विश्वासाने सांगितल. तसेच रुग्णालये हे आजारावर उपचार करणारे ठिकाण न राहता ते रुग्णाच्या आयुष्यात आरोग्य आणि आनंद कायम कसे राहील यासाठीचे केंद्र बनले पाहिजे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी कमी खर्चात उपचार देणारी हिलिंग इंडिया ही संकल्पनादेखील मांडली.