AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वसामान्यांना तगडा झटका, घरगुती सिलींडरच्या दरात वाढ, आता इतके रुपये मोजावे लागतील

केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या सिलींडरच्या दरात वाढ केली आहे. शेवटचा गॅस सिलींडरमध्ये ९ मार्च २०२४ रोजी बदल झाला होता. आता एक वर्षानंतर केंद्राने घरगुती गॅस सिलींडरचे दर वाढवले आहेत.

सर्वसामान्यांना तगडा झटका, घरगुती सिलींडरच्या दरात वाढ, आता इतके रुपये मोजावे लागतील
gas hike
| Updated on: Apr 07, 2025 | 6:10 PM
Share

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. केंद्र सरकारने एलपीजी सिलीडरची किंमत ₹५० ने वाढवून ₹८५३ केली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत, अनुदानित सिलींडरची किंमत ₹५५० झाली आहे. या दरवाढीचा फटका कोट्यवधी ग्राहकांवर होणार आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्येही किंमती वाढल्या आहेत.

केंद्र सरकारने वर्षभर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नव्हता गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ९ मार्च २०२४ रोजी करण्यात आला होता. त्यानंतर सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. विशेष म्हणजे मार्च २०२३ नंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबतही भाष्य केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती लवकरच कमी होऊ शकतात असे सरकारने म्हटले आहे.

हरदीप सिंग पुरी काय म्हणाले ?

केंद्र सरकारने एलपीजी सिलीडरच्या किमतीत ₹ 50 ची वाढ जाहीर केली आहे.आता घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ₹८०३ वरून ₹८५३ झाली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही अनुदानित सिलेंडरची किंमत ₹ 500 वरून ₹ 550 करण्यात आली आहे. या वाढीचा देशभरातील कोट्यवधी ग्राहकांना फटका बसणार आहे. एलपीजी सिलीडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ होणार आहे. PMUY लाभार्थ्यांसाठी ५०० रुपयांवरून ते ५५० रुपयांपर्यंत आणि इतर सर्वसामान्यांसाठी ही दरवाढ ८०३ रुपयांवरून ८५३ रुपयांपर्यंत असणार असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.

मार्च 2023 नंतर झाली दरवाढ

घरगुती गॅस सिलींडरच्या दरात मार्च 2023 वाढ झाली होती. मार्च 2023 नंतर प्रथमच घरगुती गॅस सिलींडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. तेव्हा घरगुती गॅस सिलींडरची किंमत 1053 रुपयांनी वाढून 1103 रुपये झाली होती. 1 जून 2021 पासून ते 1 मार्च 2023 पर्यंत घरगुती गॅस सिलींडरच्या किंमतीत लागोपाठ 10 वेळा वाढ झालेली आहे. त्यावेळी गॅस सिलींडरच्या किंमतीत 294 रुपयांची वाढ झाली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.