ट्रम्प यांचा खळबजनक निर्णय, भारतासाठी धोक्याची घंटा, त्या खास यादीमध्ये आता पाकिस्तानचा समावेश, मिळाली सुपर पावर

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरूच आहे, आता त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला असून, पाकिस्तानसोबत मोठा करार केला आहे. मात्र त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे.

ट्रम्प यांचा खळबजनक निर्णय, भारतासाठी धोक्याची घंटा, त्या खास यादीमध्ये आता पाकिस्तानचा समावेश, मिळाली सुपर पावर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 9:02 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. आधी टॅरिफ लावला, त्यानंतर H 1B व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली, त्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण हे कोणत्याही अमेरिकेतील महाविद्यालयात 5 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे आदेश दिले. त्यानंतर आता ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे पाकिस्तानची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून, ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेच्या संरक्षण विभागानं पाकिस्तानला हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र अ‍ॅडव्हास मीडियम रेंज एअर टू एअर मिसाइल खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट केलं आहे. याचाच अर्थ आता पाकिस्तान AIM-120C8/D3 हवेतल्या हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तयार करणारी अमेरिकेची कंपनी रेथियॉनसोबत थेट डील करू शकतो. अमेरिकन संरक्षण विभागाच्या वेबसाइटवर त्या सर्व देशांची यादी प्रसारीत करण्यात आली आहे, जे देश या मिसाईलला खरेदी करू शकतात, जे अमेरिकेचे ग्राहक आहेत, आता या यादीत पाकिस्तानचं नाव देखील जोडण्यात आलं आहे, सोबतच पाकिस्तानच्या नावापुढे हे मिसाईल खरेदी संदर्भात करण्यात आलेल्या कराराचा नंबर FA8675-23-C-0037 देखील देण्यात आला आहे.

सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास अमेरिकेनं त्यांच्या सध्याच्या क्षेपणास्त्र पुरवठा करारामध्ये सुधारणा केली आहे, ज्याचं बजेट 41.68 मिलियन डॉलरने वाढवून या यादीमध्ये आता पाकिस्तानंचं नाव समाविष्ट करण्यात आलं आहे. याचा अर्थ आता अमेरिकेनं पाकिस्तानसोबत मोठा लष्करी करार केला आहे, अजून या मिसाईल विक्रीचा करार झालेला नाही, मात्र भविष्यात या मिसाईल खरेदी करण्यासाठी अमेरिकेचे दारं पाकिस्तानसाठी उघडले गेले आहेत.

अमेरिका या मिसाईलचा पुरवठा आतापर्यंत आपले खास मित्र असलेले देश यूके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान यांना करत होती, आता यामध्ये नव्यानं पाकिस्तानचं नाव देखील जोडण्यात आलं आहे. मात्र अमेरिकेकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल आता भारताचं टेन्शन वाढवणारं ठरणार आहे, या करारांतर्गत आता अमेरिकेकडून पाकिस्तानला अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा होणार असल्यामुळे त्यांची ताकद वाढणार आहे.