AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भारत आता मोठ्या संकटात, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट इशारा, जगभरात खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली आहे, यावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट मोठा इशारा दिला आहे.

मोठी बातमी! भारत आता मोठ्या संकटात, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट इशारा, जगभरात खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 22, 2025 | 9:29 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव निर्माण करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीयेत. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, ज्यामध्ये 25 टक्के अतिरिक्त टॅरिफचा समावेश आहे. भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी ट्रम्प यांची मागणी आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून रशियाला युक्रेनविरोधात युद्धासाठी फंड उपलब्ध होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा भारताच्या ऊर्जा धोरणावर प्रतिक्रिया देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला इशारा दिला आहे. जर भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली नाही तर भारताला आहे त्याही पेक्षा प्रचंड टॅरिफचा सामना करावा लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना असा विश्वास दिला आहे की, भारत रशियाकडून तेलाची खरेदी बंद करेल. भारताकडून देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, बदललेली जागतिक परिस्थिती पहाता ऊर्जास्त्रोतांच्या विविधीकरणावर भर दिला जात आहे.

ट्रम्प यांचा भारताला इशारा

एअर फोर्स वन मीडियासोबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. भारतानं जर रशियाकडून तेलाची खरेदी बंद केली नाही तर त्यांना आहे त्यापेक्षाही खूप अधिक टॅरिफचा सामना करावा लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, भारत देखील आता रशियाकडून तेलाची खरेदी कमी करत आहे, आणि त्यांनी तसा आपल्याला विश्वास दिल्याचही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं आहे. भारताकडून मिळत असलेल्या पैशांचा रशिया युक्रेनविरोधात वापर करत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे अमिरेकेनं लावलेला टॅरिफ हा अन्यायकारक असल्याचं म्हणत भारताकडून या टॅरिफचा निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून असा देखील पुन्हा एकदा दावा करण्यात आला आहे की, मीच भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध विराम घडवून आणला होता. जर युद्ध थांबलं नाही तर आपण दोन्ही देशांवर देखील 200 टक्के टॅरिफ लावू असा इशारा दिला होता, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध विराम झाला असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...