आता फक्त विनाशच, महाभयंकर घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या पोस्टने जगाची झोप उडाली

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही संघर्ष थांबलेला नाहीये. स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद आहे. दरम्यान त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगभरात खळबळ उडून दिली आहे.

आता फक्त विनाशच, महाभयंकर घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या पोस्टने जगाची झोप उडाली
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 17, 2026 | 5:27 PM

28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर भीषण युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. तब्बल 40 दिवस हे युद्ध सुरू होतं. शेवटी इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धविराम झाला. मात्र जरी दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला असला तरी देखील तणाव अजूनही कायम आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून आधीच स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे, त्यानंतर अमेरिकेकडून देखील या मार्गावर नाकेबंदी लावण्यात आली. अमेरिका आणि इराणने घेतलेल्या या भूमिकेमुळे मात्र जगाची मोठी कोंडी झाली, भारतासह अनेक देशांमध्ये मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं आहे. आखाती देशांमधून स्ट्रेट ऑफ होर्मूज मार्गे होणारा कच्चं तेल आणि गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे आता हा मार्ग लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जगाचा अमेरिकेवर दबाव वाढला आहे.

आता अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया ट्रूथवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. पुन्हा एकदा लवकरच अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया ट्रूथवर आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते समुद्रात जहाजामध्ये एका कमांडरसोबत दिसत आहेत, आणि या फोटोला त्यानी वादळापूर्वीची शांतता असं कॅप्शन दिलं आहे. ट्रम्प यांचा या पोस्टमुळे पुन्हा एकदा अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची ही पोस्ट अशावेळी समोर आली आहे, ज्यावेळी एका रिपोर्टमधून अशी माहिती समोर आली होती की,अमेरिका लवकरच इराणवर भीषण हल्ला करू शकतो. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एका युद्धनौकेवर आहेत, त्यांच्यासोबत एक कमांडर देखील आहे. या फोटोला त्यांनी वादळापूर्वीची शांतता असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी देखील दिली होती, जर लवकरात लवकर पूर्ण युद्धविराम झाला नाही तर आम्ही इरावर महाभयंकर असा हल्ला करू, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

Follow Us