मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका फोनमुळे जगभरात खळबळ, पुन्हा युद्ध होणार? या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला थेट देश सोडण्याचे आदेश

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या एका फोनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे, पुन्हा एकदा दोन देशामध्ये युद्ध पेटणार का? हे पहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका फोनमुळे जगभरात खळबळ, पुन्हा युद्ध होणार? या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला थेट देश सोडण्याचे आदेश
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Dec 01, 2025 | 9:44 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा ट्रम्प चर्चेमध्ये आले आहेत. व्हेनेझुएला आणि अमेरिकेमधील तणाव प्रचंड वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलामध्ये असलेले आणि या देशाच्या जवळपास असलेले सर्व एरोस्पेस बंद करत असल्याची घोषणा केली होती, त्यानंतर आता त्यांनी थेट व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा तणाव आणखी भडकण्याची शक्यता असून, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती देताना सांगितलं की आपलं व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे, मात्र तेव्हा या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय बोलणं झालं? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

मात्र या संदर्भात आता माहिती समोर आली आहे, मियामी हेराल्डच्या एका रिपोर्टनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना फोन केला होता, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट फोनवरूनच व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना धमकी दिली आहे, जर तुम्हाला स्वत:चा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल तर तुम्ही तातडीनं देश सोडा, असं ट्र्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आपण स्वत:तुमची पत्नी आणि मुलांना सुरक्षित देशाच्या बाहेर काढू अशी ऑफरही ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांना दिली आहे. मात्र त्याबदल्यात तुम्हाला देश सोडावा लागेल अशी अट ट्रम्प यांनी मादुरो यांच्यापुढे ठेवली आहे, मात्र मादुरो यांनी ट्रम्प यांची ही अट फेटाळून लावल्यानं आता संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

व्हेनेझुएलाचे एअरस्पेस केले बंद

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर मोठी कारवाई केली आहे, त्यांनी थेट व्हेनेझुएलाचे एअरस्पेस बंद करण्याचे आदेश दिले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग्स तस्करी होते, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे. ही ड्रग्स तस्करी थांबली नाही तर अमेरिका थेट या देशावर सैन्य कारवाई करेल असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून व्हेनेझुएलाला देण्यात आला होता. दरम्यान त्यानंतर आता ट्रम्प यांनी थेट राष्ट्रपतींनाच देश सोडण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा दोन देश युद्धाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.