मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी, भारताचा दावा ठरला खरा, मध्यस्थीबाबत केलं मोठं वक्तव्य

मोठी बातमी समोर येत आहे, सीजफायरच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारली आहे. त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी, भारताचा दावा ठरला खरा, मध्यस्थीबाबत केलं मोठं वक्तव्य
Image Credit source: social media
| Updated on: May 15, 2025 | 7:23 PM

मोठी बातमी समोर येत आहे, सीजफायरच्या वक्तव्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारली आहे. सुरुवातीला त्यांनी मोठा दावा केला होता, आपल्या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानने यु्द्धविरामाची घोषणा केली असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांनी आता आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेतला आहे. कतारच्या दोहामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मला असं नाही म्हणायचं की मी मध्यस्थी केली, मात्र मी त्यांना मदत आवश्य केली आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सोबतच त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, आता भारत आणि पाकिस्तान खूप आनंदी आहेत, दोघेही व्यापारावर बोलत आहेत. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा एकदा युटर्न मारला, भारत आणि पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून आपसात भांडत आहेत. मला माहीत नाही हा वाद मी मिटवू शकेल की नाही, हे खूप आवघड प्रकरण आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

भारतानं आधीच फेटाळला होता ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाबाबत बोलताना मोठा दावा केला होता. मी दोन्ही देशांवर व्यापारिक दबाव टाकला तेव्हाच युद्धविराम शक्य झाला, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. आता हे दोन्ही देश युद्धाची नाही तर व्यापाराची गोष्ट करतात असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा आधीच फेटाळून लावला होता. युद्धविरामामध्ये व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता असं भारतानं म्हटलं होतं. हा युद्ध विरामाचा निर्णय दोन्ही देशांमध्ये झाला आहे, यामध्ये तिसऱ्या देशाची भूमिका नाही असं देखील भारतानं म्हटलं होतं. त्यानंतर आता याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट कबुलीच दिली आहे, मी मध्यस्थी नाही तर मदत केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us