AMCA Project : चीन, पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या भारताच्या AMCA प्रोजेक्टबद्दल DRDO कडून मोठी गुडन्यूज
2047 चा विकसित भारत आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. एरोनॉटिकल डेव्लपमेंट एजन्सी ADA ने 'एरोनॉटिक्स 2047' सेमीनारचं आयोजन केलं होतं.

सध्या इंडियन एअर फोर्स फायटर स्क्वाड्रनच्या कमतरतेचा सामना करत आहे. मिग-21 बायसन विमानं निवृत्त झाली आहेत. चीन आणि पाकिस्तान यांचा एकाचवेळी सामना करण्यासाठी 42 स्क्वाड्रनची आवश्यकता आहे. पण सध्या ही संख्या कमी आहे. तेजसचा पुरवठा वेळेवर होणं गरजेचं आहे. तेजस हे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेलं फायटर विमान आहे. तेजसचा वेळेवर पुरवठा होत नसल्याबद्दल एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती. HAL ने बनवलेलं तेजस LCA Mk-1A हे इंडियन एअरफोर्समध्ये समावेशाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहे. पाचव्या पिढीचं फायटर जेट AMCA आणि तेजसचं LCA Mark-II यांचा विकास कार्यक्रम वेळापत्रकानुसार सुरु आहे अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही कामत यांनी दिली.
LCA तेजस विमान प्रकल्पाला 25 वर्ष झालीत. त्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “LCA तेजसचा खूप शानदार प्रवास आहे. या फायटर जेटचा समावेश झाला आहे. आता आमचं सर्व लक्ष तेजस मार्क-2 आणि AMCA प्रोजेक्टवर आहे. हे दोन्ही प्रोजेक्ट वेळापत्रकानुसार सुरु आहेत. इंडियन एअर फोर्सला दिलेला शब्द पूर्ण करु अशी अपेक्षा आहे” असं समीर कामत म्हणाले. दोन्ही प्रोजेक्टच काम वेळेवर सुरु आहे ही चांगली बाब आहे असं कामत म्हणाले.
AMCA हे पाचव्या पिढीचं विमान
तेजस मार्क-2 चं पहिलं उड्डाण जूनमध्ये अपेक्षित आहे. AMCA प्रोजेक्टच्या चाचण्या जूनच्या अखेरीस अपेक्षित आहेत.पाचव्या जनरेशनच्या विमानाचं पहिलं उड्डाण 2029 मध्ये अपेक्षित आहे. “AMCA हे पाचव्या पिढीचं विमान असून त्यात अनेक नवीन टेक्नोलॉजी आहेत. हे स्टेल्थ एअरक्राफ्ट आहे. AMCA मध्ये अनेक नवीन टेक्नोलॉजीस आहेत” असं समीर कामत म्हणाले. 2047 चा विकसित भारत आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. एरोनॉटिकल डेव्लपमेंट एजन्सी ADA ने ‘एरोनॉटिक्स 2047’ सेमीनारचं आयोजन केलं होतं.
पक्ष्यांसारखे पंख आत घेऊ शकतात
काही दिवसांपूर्वी या एम्का प्रोजेक्टवर काम करताना आपल्या वैज्ञानिकांना मोठं यश मिळाल्याची बातमी होती. DRDO ने मॉर्फिंग विंग टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी केली होती. फिफ्थ जेन फायटर जेटसाठी ही खूप मोठी टेक्नोलॉजी आहे. ही अशी टेक्नोलॉजी आहे, ज्यामध्ये फायटर जेट्स आपले पंख पक्ष्यांसारखे आत घेऊ शकतात. म्हणजे हवेत उड्डाणवस्थेत पंखांचा आकार कमी-जास्त करुन बदलता येतो. गरज पडल्यास पंख लपवता येतात.
