दिल्लीनंतर आणखी एका राज्यात 8 दिवसांचा लॉकडाऊन, देश पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?

| Updated on: Apr 20, 2021 | 5:53 PM

झारखंडमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. हा लॉकडाऊन 22 ते 29 एप्रिल या कालावधित लागू असेल.(Jharkhand government announces lockdown)

दिल्लीनंतर आणखी एका राज्यात 8 दिवसांचा लॉकडाऊन, देश पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने?
lockdown
Follow us on

रांची : कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. रोज लाखो नवे रुग्ण आढळत असून हजारो रुग्णांचा मृत्यू होत आहे. देशभरात ठिकठिकाणी आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. झारखंड (Jharkhand government) राज्यातसुद्धा कोरोना वाढल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालीये. याच गोष्टीचा विचार करुन झारखंडमध्ये लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आलाय. हा लॉकडाऊन 22 ते 29 एप्रिल या कालावधित लागू असेल. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता झारखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. (due to increase in corona patient after delhi Jharkhand government announces lockdown only Essential services allowed)

देशात कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावतोय. लाखोंच्या संख्येने देशात कोरोनाग्रस्त आढळत आहेत. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता राजधानी दिल्लीमध्येसुद्धा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानंतर आता झारखंड राज्यातसुद्धा परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून येथील राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

झारखंडमध्ये काय सुरु असणार ?

झारखंड सरकारने 22 ते 29 एप्रिल म्हणजेच आठ दिवसांचा संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद असणार आहेत. या काळात राज्यातील सर्व धार्मिक स्थळं सुरु राहणार आहेत. मात्र, या ठिकाणी भाविकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खाणकाम, शेती आणि बांधकाम करण्याससुद्धा सरकारने परवानगी दिलेली आहे.

झारखंडमध्ये कोरोनाची स्थिती काय ?

झारखंड राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. येथे कोरोनाग्रस्तांता आकडा 1 लाख 58 हजार 953 वर पोहोचला आहे. तर सध्या येथे 25619 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. येथे आतापर्यंत 1 लाख 31 हजार 928 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत येथे एकूण 1406 जणांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्या :

Corona Cases and Lockdown News LIVE : गडचिरोली जिल्ह्यात आज 615 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Lockdown: राज्यात कोरोनाची नवी नियमावली लागू; दुकानं फक्त सकाळी 7 ते 11च्या वेळेत सुरु राहणार

Oxygen Man | मरणकळा सोसणाऱ्यांचा जीवनदाता, लोकांना देतो मोफत ऑक्सिजन सिलिंडर; वाचा ‘ऑक्सिजन मॅन’ची अनोखी कहाणी

(due to increase in corona patient after delhi Jharkhand government announces lockdown only Essential services allowed)