AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oxygen Man | मरणकळा सोसणाऱ्यांचा जीवनदाता, लोकांना देतो मोफत ऑक्सिजन सिलिंडर; वाचा ‘ऑक्सिजन मॅन’ची अनोखी कहाणी

शहानवाज शेख यांची विशेष चर्च होत आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहेत. (mumbai oxygen man shahnawaz shaikh oxygen cylinders)

Oxygen Man | मरणकळा सोसणाऱ्यांचा जीवनदाता, लोकांना देतो मोफत ऑक्सिजन सिलिंडर; वाचा 'ऑक्सिजन मॅन'ची अनोखी कहाणी
mumbai oxygen man
| Updated on: Apr 20, 2021 | 5:04 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोज हजारो लोक रुग्णालयांत उपचारासाठी दाखल होत आहेत. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहानवाज शेख (Shahnawaz shaikh) यांची विशेष चर्च होत आहे. लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन दिले आहे. तसेच लोकांना कशा प्रकारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देता येईल, यासाठी ते जिवाचं रान करत आहेत. त्यांच्या याच धडपडीमुळे ते समस्त मुंबईत ऑक्जिजन मॅन (Oxygen Man) म्हणून ओळखले जात आहेत. (Mumbai Malad Shahnawaz shaikh helping Corona patient giving them Oxygen Cylinders people calling him as Oxygen Man)

मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

सध्या कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्यामुळे अनेकजण खबरदारी म्हणून घरात बसून आहेत. तसे निर्देश राज्य सरकारनेसुद्धा दिले आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात शहानवाज शेख दिवसरात्र एक करुन लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या एका मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. याच गोष्टीचा शहनवाज यांना धक्का बसला आणि त्यांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी काम करण्याचं ठरवलं.

ऑक्सिजन सिलिंडरसाठी कार विकली

मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्यानंतर शहानवाज यांनी लोकांची मदत करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी जमेल तेवढ्या लोकांना ऑक्सिजनचे सिलिंडल देण्याचे ठरवले. त्यासाठी भांडवल उभं करण्यासाठी त्यांनी स्वत:ची कार विकली. स्वत:ची फोर्ड एंडेव्हर ही कार विकत त्यांनी 60 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तसेच 40 सिलिंडर भाड्याने घेतले. असे एकूण त्यांच्याकडे सध्या 200 ऑक्सिजनचे सिलिंडर आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या या कार्याचा अनेकांना फायदा होतो झाला. गरजूंना ते ऑक्सिजनचे सिलिंडर देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये त्यांनी जवळपास 4 हजार कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजन सिलिंडर देऊन त्यांची मदत केली होती.

दरम्यान, यावर्षी कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त विदारक आहे. ही परिस्थिती पाहता शहानवाज यांनी मदतीसाठी पुढे येत मालाड येथे वॉर रुम तयार केली आहे. या ठिकाणी मदतीसाठी त्यांना रोज जवळपास 500 फोन कॉल येत आहेत. जमेल त्या पद्धतीने ते लोकांना मदत करत आहेत. ऑक्सिजन सिलिंडरसोबतच बेड, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व गोष्टींची माहिती ते याच वॉर रुममधून लोकांना देत आहेत. कोरोनाकाळातील त्यांच्या या कार्यमुळे अनेकजण त्यांचे अभिनंदन करत आहेत.

इतर बातम्या :

ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रस्त्यावर, सोबतीला मनसे; ठाण्यात वातावरण तापलं

Corona Cases and Lockdown News LIVE : नागपूर विद्यापीठाने हिवाळी परीक्षा पुढे ढकलल्या, कोरोना संसर्ग वाढल्यामुळे निर्णय़

उन्हाळ्याच्या हंगामात ‘कैरीचे पन्हे’ पिण्याचे ‘हे’ आहेत महत्त्वपूर्ण फायदे!

(Mumbai Malad Shahnawaz shaikh helping Corona patient giving them Oxygen Cylinders people calling him as Oxygen Man)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.