Duologue NXT: TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांची कनिका टेकरीवाल यांच्याशी खास चर्चा, यशाचे गुपित येणार समोर

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या Duologue NXT या खास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात, TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे जेटसेटगोच्या संस्थापक कनिका टेकरीवाल यांच्यात खास चर्चा करणार आहेत.

Duologue NXT: TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांची कनिका टेकरीवाल यांच्याशी खास चर्चा, यशाचे गुपित येणार समोर
Duologue NXT Barun Das MD and CEO of TV9 Network
| Edited By: | Updated on: Sep 25, 2025 | 3:09 PM

देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 च्या Duologue NXT या खास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात, TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास हे जेटसेटगोच्या संस्थापक कनिका टेकरीवाल यांच्यात खास चर्चा करणार आहेत. यामध्ये कनिका या आपल्या प्रेरणादायी प्रवासाबद्दलआणि आपल्याला आलेल्या अनुभवाबद्दल माहिती सांगणार आहेत. Duologue NXT चा संपूर्ण भाग आज रात्री 10:30 वाजता News9 वर पाहता येणार आहे. तसेच हा भाग Duologue YouTube चॅनेल आणि News9 Plus अॅपवर देखील पाहता येणार आहे.

TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी घेतलेल्या या मुलाखतीत विविध विषयांचा उलगडा होणार आहे. बरूण दास हे कनिका यांच्याकडून विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहेत. गेल्या तीन हंगामांमध्ये, Duologue with Barun Das या टॉक शोने मोठं नाव कमवलं आहे. आता Duologue NXT आता तो वारसा पुढे नेत आहे. हे असे व्यासपीठ आहे जे धाडसी महिलांचा शोध घेते आणि त्यांचा प्रवास जगासमोर मांडते.

कनिका यांच्या संघर्षांची कहाणी

कनिका टेकरीवाल यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आकाशात भरारी घेणे हे कनिका यांच्या रक्तात आहे. कनिका यांच्या यशापूर्वी संघर्षांची मोठी मालिका आहे. कनिका यांना पायलट बनायचे होते, मात्र “मुली पायलट बनत नाहीत” या म्हणीने त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. त्यानंतर कर्करोगाशी तिची लढाई सुरु झाली, यावर विजय मिळवल्यानंतर भारतात खाजगी विमान कंपनी सुरू करण्याची योजना जाहीर केल्यावर त्यांची थट्टा करण्यात आली. मात्र हाच अडथळा पुढे फायद्याचा ठरला.

बरुण दास यांनी कनिका यांच्या संघर्षाने भरलेल्या प्रवासावर प्रकाश टाकला. कनिका यांची समोर आलेल्या अडथळ्याचे रुपांतर संधीमध्ये कसे केले हे स्पष्ट होत आहे. बरुण दास म्हणाले की “कनिकासारख्या अद्वितीय व्यक्तींना वेगळे करणारी गोष्ट म्हणजे असे लोक कधीही आदर्श परिस्थितीची कधीही वाट पाहत नाहीत. ते परिस्थिती स्व:ता तयार करतात.”

कनिका यांच्या कंपनीने स्वप्न

JetSetGo ही भारतातील विमान वाहतूक क्षेत्रातील एक नवीन खाजगी कंपनी आहे. कनिका यांचे स्वप्न आहे की, दीर्घकालीन कमतरता दूर करण्याची आणि भारताला STOL (शॉर्ट टेक-ऑफ आणि लँडिंग) आणि eVTOL (इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग एअरक्राफ्ट) उड्डाणे आणि विमान निर्मितीचे केंद्र बनवणे. कनिका यांचा खरा उद्देश लोकांच्या जीवनातील वेळ वाचवणे हा आहे.

कनिका यांनी सांगितले की, “लवचिकता आणि चिकाटी ही नेहमीच अडचणींवर मात करणारी गोष्ट आहे. मी कितीतरी वेळा कर्करोगाच्या बाबतीत, टीकाकारांकडून किंवा बदलाला विरोध करणाऱ्यांकडून नाही हा शब्द ऐकला, मात्र मला यातून नेहमी प्रेरणा मिळत गेली.

लिंग-आधारित कौतुक संपायला हवं

कनिका यांनी लिंग आधारित कौतुक संपायला हवं असं विधान केलं आहे. त्यांनी म्हटले की, “एक उद्योजक हा एक उद्योजक असते. एक नेता ही एक नेताच असतो. ‘वुमन आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ सारखी लेबल्स वापरणे बंद केले तर खरी प्रगती साध्य होईल, जगातील प्रत्येकासाठी समान संधी निर्माण करण्याची वेळ आली आहे.”

टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांच्यासोबतची ही मुलाखत कनिका यांच्या स्वप्नांवर प्रकाश टाकते आणि प्रेक्षकांना वेगळा विचार करण्यास भाग पाडत आहे. बरुण दास यांच्या विचारशील हस्तक्षेपाने आकार घेतलेला कनिका टेकरीवालचा प्रवास भारतीय विमान वाहतूक क्षेत्राच्या लवचिकता आणि अमर्याद क्षमतेचा एक स्पष्ट पुरावा आहे.