उत्तराखंडनंतर निसर्गाचा आणखी एक धोका, जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4:56 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

उत्तराखंडनंतर निसर्गाचा आणखी एक धोका, जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके

जम्मू-काश्मीर : उत्तराखंडमध्ये हिमकडा तुटल्याने निर्सर्गाचा मोठा हाहाकार पहायला मिळाला. यानंतर आज सोमवारी पहाटे जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर (Richter scale) हा भूकंप 3.5 होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 4:56 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेचे हानी झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. (earthquake of magnitude 3.5 on the Richter scale occurred in Jammu and Kashmir today)

खरंतर, बुधवारी केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये 4.5 तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे जाणवले. यासंबंधी हवामान खात्याच्या अधिकाऱ्याकडून माहिती देण्यात आली होती. या हादऱ्यामध्येही कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगण्यात आलं. पण यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 7.59 वाजता हा भूकंपाचा हादरा जाणवला होता. तर भूकंपाचं केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होतं.

महाराष्ट्राच्या हिंगोलीमध्येही गुढ आवाजाची मालिका

मराठवाड्यातल्या हिंगोली (hingoli) जिल्ह्यात 31 जानेवारीला काही परिसर गुढ आवाजानं हादरुन गेला होता. वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी ह्या तीन तालुक्यात गुढ आवाज येत असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे गावात रिश्टर स्केलवर 3.2 इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती. यात कोणतीही मनुष्यहाणी झालेला नाही पण एका घराची भींत पडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती.

पुण्यातही भूकंपाची नोंद

दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी पुणे जिल्ह्यातही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.6 इतकी नोंदवली गेली होती. पुरंदर तालुक्यात 7 वा. 28 मिनिटांनी हा धक्का जाणवला होता. त्याचं केंद्र पुरंदरमध्येच 12 कि.मी. खोलमध्ये असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून देण्यात आली होती.

का होतो भूकंप?

भूकंप येण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये 7 प्लेट्स सतत हालचाल करत असतात. पण काही ठिकाणी त्या एकमेकांशी टक्कर घेतात त्या स्थानांना फॉल्ट लाइन झोन असं म्हणतात. वारंवार टक्कर झाल्याने प्लेट्सच्या कडा तुटतात. अशात आणखी प्रेशर वाढलं की या प्लेट्स तुटू लागतात. या तुटण्यामुळे आतमधली उर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते आणि त्यालाच भूकंप असं म्हणतात. (earthquake of magnitude 3.5 on the Richter scale occurred in Jammu and Kashmir today)

संबंधित बातम्या –

Photos : देवभूमी उत्तराखंडमध्ये पुन्हा हाहा:कार, एक एक फोटो सांगतोय जीवन-मरणाची कसोटी

Glacier meaning : महापुरामुळे विनाश घडवणारा हिमकडा म्हणजे काय? उत्तराखंडापासून हरिद्वारपर्यंत अलर्ट कशासाठी?

Uttarakhand Joshimath Dam: देवभूमीतील प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले; अमित शहांकडून मदतीचं आश्वासन

Uttarakhand Joshimath Dam: उत्तराखंडाच्या हाहाकाराचा पहिला व्हिडीओ, तुमचाही थरकाप उडेल!

(earthquake of magnitude 3.5 on the Richter scale occurred in Jammu and Kashmir today)

Published On - 6:59 am, Mon, 8 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI