Uttarakhand Joshimath Dam: देवभूमीतील प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले; अमित शहांकडून मदतीचं आश्वासन

उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले असून अनेकजण बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. (150 people dead in uttarakhand ice storm)

Uttarakhand Joshimath Dam: देवभूमीतील प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले; अमित शहांकडून मदतीचं आश्वासन


उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात 100 ते 150 लोक दगावले असून अनेकजण बेपत्ता झाल्याची भीती उत्तराखंडचे मुख्यसचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे जोशीमठकडे रवाना झाले आहेत. (150 people dead in uttarakhand ice storm)

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा नदीत मोठा हिमकडा कोसळल्याने या नदीला महापूर आला आहे. तसेच धरणाचा बांध फुटल्याने नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक गावं पाण्याखाली गेली असून शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 100 ते 150 लोक दगावल्याची भीती राज्याचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत स्वत: जोशीमठाकडे जायला निघाले आहेत.

शहांचं मदतीचं आश्वासन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केली असून त्यांना सर्वोतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमही उत्तराखंडला पाठवण्यात येत असल्याचं शहा यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केलं. दरम्यान, देवभूमीतील लोकांना वाचवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचंही शहा यांनी सांगितलं.

पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रावत यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. तसेच उत्तराखंडमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही मोदींनी संवाद साधला. मोदींनीही रावत यांना केंद्राकडून आवश्यक ती मदत देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

एनडीआरएफची टीम पोहोचली

गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर केंद्र सरकारने अगदी काहीवेळातच दिल्लीहून एनडीआरएफची एक टीम उत्तराखंडला पाठवली. ही टीम उत्तराखंडमध्ये पोहोचली असल्याचं सांगण्यात येत असून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करणार आहे.

सरकारकडून हेल्पलाईन जारी

या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने तात्काळ हेल्पलाइन क्रमांक जारी- 1070 आणि 9557444486 जारी केला आहे. तसेच या दुर्घघटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन. 9557444486 हा हेल्पालाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

पोलिसांकडून हेल्पलाईन जारी

व्हॉट्सअॅप नंबर 9458322120,
FaceBook chamoli police,
Twitter @chamolipolice @SP_chamoli,
Instagram chamoli_police

संबंधित बातम्या:

Uttarakhand Joshimath Dam: उत्तराखंडाच्या हाहाकाराचा पहिला व्हिडीओ, तुमचाही थरकाप उडेल!

Uttarakhand Joshimath Dam: महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, महापुरामुळे अनेक लोक वाहून गेले, अ‍ॅलर्ट जारी; पाहा व्हिडीओ!

Uttarakhand Joshimath Dam News LIVE : जोशीमठात निसर्गाचं रौद्ररुप, चमोलीमध्ये पॉवर प्रोजेक्ट नष्ट, 50 लोक बेपत्ता