Uttarakhand Chamoli Glacier burst LIVE: तपोवन बोगद्यात बचावकार्य थांबवले, 10 जणांचे मृतदेह हाती

उत्तराखंडमध्ये जोशीमठात हिमकडा कोसळल्याने धरण फुटल्याची माहिती देण्यात आली आहे.

Uttarakhand Chamoli Glacier burst LIVE: तपोवन बोगद्यात बचावकार्य थांबवले, 10 जणांचे मृतदेह हाती

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दुर्घटनेत 10 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान अद्याप या दुर्घटनेत 100-120 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

हिमनदी कोसळत खाली आल्यानं पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ होऊन जिल्ह्यातील ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाचा बांध फुटला आणि धौलगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे या भागात पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका पाण्याच्या प्रवाहाजवळ असलेल्या गावांनाही बसला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 07 Feb 2021 19:00 PM (IST)

  मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत, अद्याप 125 लोक बेपत्ता : मुख्यमंत्री सिंह

  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी दोन वेळा फोन करत घटनेची चौकशी केली आहे. तसेच बिहार, गुजरात आणि इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे फोन आले आहेत. मृताच्या कुटुंबाला चार लाखांची भरपाई दिली जाईल.  सैन्यातील लोक तिथे पोचले आहेत. एनडीआरएफची एक टीम दिल्लीहून या ठिकाणी आली आहे. जवळपास 125 लोक बेपत्ता आहेत.
 • 07 Feb 2021 17:56 PM (IST)

  100 ते 150 जण बेपत्ता, शोधमोहिम सुरु

  उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा प्रोजेक्टवर हिमकडा कोसळला आहे. त्यामुळे ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाशी संबंधित जवळपास 100 ते 150 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

 • 07 Feb 2021 16:46 PM (IST)

  बोगद्यातील लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु

  चमोलीतील तपोवन धरणाजवळ बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु

 • 07 Feb 2021 16:38 PM (IST)

  तपोवन धरणाजवळ अनेकजण अडकल्याची भीती

  आईटीबीपीच्या जवानांकडून बचावकार्य सुरु, तपोवन धरणाजवळ पाण्याच्या प्रवाहात 16-17 जण अडकल्याची भीती, तपोवन सुरुंग उघडण्यासाठी खोदकाम सुरू

 • 07 Feb 2021 16:33 PM (IST)

  250 जवानांकडून बचावकार्य, 10 मृतदेह हाती

  आईटीबीपीचे अधिकारी एसएस देसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळी 250 जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे. या दुर्घटनेत 9 ते 10 नागरिकांचे मृतदेह आढळले आहेत.

 • 07 Feb 2021 15:03 PM (IST)

  3 जणांचे मृतदेह सापडले : ITBP

  ITBP च्या म्हणण्यानुसार, चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात आतापर्यंत 3 मृतदेह सापडले आहेत. याआधी उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत 100 ते 150 लोकांचा मृत्यू होण्याचा धोका आहे. यामुळे उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 • 07 Feb 2021 15:00 PM (IST)

  चमोली पोहोचले त्रिवेंद्र सिंह रावत, परिस्थितीची पाहणी सुरू

  उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे चमोली इथं पोहोचले असून जोशीमठला इथंही गेले. भारतीय सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांनी मुख्यमंत्री रावत यांना तपोवनमधील पूर परिस्थितीची माहिती दिली.

 • 07 Feb 2021 14:49 PM (IST)

  भारतीय सैन्याकडून बचाव कार्य सुरू, 600 सैनिक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तयार

  लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या 6 टीम्स, म्हणजे तब्बल 600 सैनिक पूरग्रस्तांच्या दिशेने पुढे जात आहेत. भारतीय सैन्याने उत्तराखंड सरकार आणि एनडीआरएफला पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदत करण्यासाठी हेलिकॉप्टर्स आणि सैनिक तैनात केले आहेत.

 • 07 Feb 2021 14:03 PM (IST)

  पंतप्रधान मोदींनी साधला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद

  उत्तराखंडमधील या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. याशिवाय, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. अधिकारी युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.

 • 07 Feb 2021 14:01 PM (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, मदतीचं आश्वासन

 • 07 Feb 2021 13:58 PM (IST)

  NDRF ची टीम दिल्लीकडून उत्तराखंडसाठी रवाना

  अमित शहा यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मदतीचं आवाहन केलं आहे. यानंतर तात्काळ NDRF च्या काही टीम्स दिल्लीवरून रवाना झाल्या आहेत.

 • 07 Feb 2021 13:56 PM (IST)

  चमोली, जोशीमठ आणि इतर क्षेत्र आणखी प्रभावित होतील: NDRF डीजी

  NDRF च्या डीजी एस.एन. यांच्या नेतृत्त्वाखाली हिमकडा तुटल्यामुळे ऋषिगंगा नदी प्रभावित झाली आहे. BRO द्वारे तयार केलेल्या पुलांवरही पाणी गेलं आहे. यामुळे चॉमोली, जोशीमठ आणि इतर परिसरात धोका वाढू शकतो

 • 07 Feb 2021 13:47 PM (IST)

  चमोली भागात 100 ते 150 लोक दगावल्याची भीती : उत्तराखंड चीफ सेक्रेटरी

  उत्तराखंडचे चीफ सेक्रेटरी ओमप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, चमोली गावातील 100 ते 150 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 • 07 Feb 2021 13:35 PM (IST)

  Photo : महाभयंकर! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, पाहा फोटो

 • 07 Feb 2021 13:30 PM (IST)

  मदतीसाठी 1905 वर देखील करू शकता कॉल

  मुख्यमंत्र्यांकडून हेल्पलाइन क्रमांक जारी- 1070 आणि 9557444486
  मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.
  हा आहे नंबर – 9557444486
  रावत यांनी ट्वीटमध्ये लिहलं की “जर तुम्ही एखाद्या प्रभावित क्षेत्रामध्ये फकला असाल, आणि तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज असेल तर कृपया या नंबरवर 1070 किंवा 9557444486 नंबरवर संपर्क करा. कृपया घटनेचा व्हीडिओ व्हायरल करू नका.

 • 07 Feb 2021 13:24 PM (IST)

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या ग्रामसभेला लवकरच परवानगी देणार – हसन मुश्रीफ

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या ग्रामसभेला लवकरच परवानगी देणार, मंगळवारी याबाबतचा आदेश काढला जाणार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात माहिती, गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या ग्रामसभा अखेर सुरू होणार, राजू शेट्टी यांच्या मागणी नंतर ग्रामविकास विभागाची काळजी घेऊन ग्रामसभा घ्यायला परवानगी देण्यासाठी हालचाली सुरू

 • 07 Feb 2021 13:23 PM (IST)

  शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे एका लग्नात पुन्हा एकत्र, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

  सातारा : भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे एका लग्न कार्यात मांडीला मांडी लावुन एकत्र, दोन्ही नेते एकत्र आल्याने पुन्हा एकदा दोघे चर्चेत, कुडाळ येथील भाषणात शिवेंद्रराजे यांनी मी संपलो तरी चालेल पण माझ्या मार्गात येणारयाला सोडणार नसल्याचे ते म्हणाले होते, आ.शशिकांत शिंदे यांनी देखील पक्ष वाढीसाठी संघर्ष करावा लागला तरी चालेल अस प्रतिउत्तर त्यांनी दिल होत…

 • 07 Feb 2021 13:21 PM (IST)

  निसर्गाचं असं रुप पाहिलं नसेल, काळाजाचा ठोका चुकवणारा VIDEO

 • 07 Feb 2021 13:14 PM (IST)

  ITBP च्या दोन टीम घटनास्थळी, NDRF ला डेहराडूनला पाठवण्यात आलं – गृह राज्यमंत्री

  गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ITBP ची दोन पथकं घटनास्थळी दाखल झाली आहे. NDRF च्या तीन तुकड्यांना डेहराडूनला रवाना करण्यात आलं आहे. आणि आयएएएफ हेलिकॉप्टरच्या मदतीने अतिरिक्त तीन संघ संध्याकाळपर्यंत पोहोचणार.

 • 07 Feb 2021 13:12 PM (IST)

  नदीच्या किनाऱ्यावरील परिसर रिकामे केले

  मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितलं की, खबरदारी म्हणून नदीच्या किनारी असलेल्या सर्व गावांना रिकामं करण्यात आलं आहे. यामध्ये श्रीनगर, धारी देवी, देवप्रयाग आणि इतर परिसरांमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे. तर श्रीनगरजवळ असलेल्या कीर्तिनगर क्षेत्रामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 • 07 Feb 2021 13:10 PM (IST)

  भागीरथीचा जोरदार फ्लो रोखण्यासाठी श्रीनगर आणि ऋषिकेश धरण रिकामं करणार

  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा वाढता प्रवाह रोखण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामं करण्यात येईल

 • 07 Feb 2021 13:08 PM (IST)

  पुण्यातही NDRF टीम अलर्टवर, घटनेवर बारीक लक्ष

  पुण्यातही एनडीआरएफची टीम सतर्क ठेवण्यात आली आहे. या घटनेनंतर पथक सतर्क झालं आहे. महत्त्वाची सूचना येताच एनडीआरएफचे जवान रवाना होतील. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातही एसडीआरएफच्या टीमला सतर्क करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तराखंडमधील धरण फुटल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थिती लक्षात घेता यूपीमधील संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना सतर्कतेची सूचना दिली आहे.

 • 07 Feb 2021 13:01 PM (IST)

  उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, अंगावर शहारे आणणारा व्हीडिओ समोर

 • 07 Feb 2021 12:57 PM (IST)

  ITBP चे जवानांकडून बचाव कार्याला सुरुवात

  बचाव मोहिमेसाठी ITBP च्या 200 जवानांची टीम तैनात करण्यात आली असून भारतीय सैन्याचे 4-5 जवान स्टँडबायवर असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही क्षणी, आवश्यक असल्यास त्यांना मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात केले जाऊ शकतं.

 • 07 Feb 2021 12:54 PM (IST)

  नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी या नेत्यांची हजेरी, अमित शहाही दाखल

  नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते प्रसाद लाड यांचं सिंधुदुर्गमध्ये आगमन. कणकवली येथील sspm च्या हेलिपॅडवर उतरले हेलिकॉप्टर. आज दुपारी पडवे येथे राणेंच्या मेडिकल कॉलेजचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला पाटील आणि दरेकर,लाड यांची राहणार आहे उपस्थिती. हेलिपॅड वरून पाटील आणि दरेकर ,लाड बाय रोड निघाले कार्यक्रमस्थळी.

 • 07 Feb 2021 12:52 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांकडून हेल्पलाइन क्रमांक जारी- 1070 आणि 9557444486

  मुख्यमंत्र्यांकडून हेल्पलाइन क्रमांक जारी- 1070 आणि 9557444486
  मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत.
  हा आहे नंबर – 9557444486
  रावत यांनी ट्वीटमध्ये लिहलं की “जर तुम्ही एखाद्या प्रभावित क्षेत्रामध्ये फकला असाल, आणि तुम्हाला कुठल्याही मदतीची गरज असेल तर कृपया या नंबरवर 1070 किंवा 9557444486 नंबरवर संपर्क करा. कृपया घटनेचा व्हीडिओ व्हायरल करू नका.

 • 07 Feb 2021 12:49 PM (IST)

  जोशीमठ परिसरातील रेणी गावात बचावकार्य सुरू

 • 07 Feb 2021 12:46 PM (IST)

  खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात येणार, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

  अलकानंदजवळील भागातून लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथी नदीचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. अलकनंदाच्या पाण्याचा प्रवाह रोखण्यासाठी श्रीनगर धरण आणि ऋषिकेश धरण रिकामं करण्यात येईल. घटनास्थळी एसडीआरएफ सतर्क असून मी घटनास्थळी जात असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांची माहिती…

 • 07 Feb 2021 12:43 PM (IST)

  गावंच्या गावं वाहून गेली?

  मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहे.

 • 07 Feb 2021 12:42 PM (IST)

  रूषी गंगा प्रकल्पाला मोठं नुकसान, 4 जिल्ह्यात अर्लट जारी

  रूषी गंगा प्रकल्पाला मोठं नुकसान, चमोलीच्या सखल भागांना अर्लट, 50 ते 75 जण बेपत्ता असल्याची माहिती, 4 जिल्ह्यात करण्यात अर्लट जारी,  उत्तराखंड डीजीपीची माहिती

 • 07 Feb 2021 12:39 PM (IST)

  निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार

  आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

 • 07 Feb 2021 12:37 PM (IST)

  धौली गंगा नदीला आला महापूर

  जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

 • 07 Feb 2021 12:36 PM (IST)

  धरणाच्या आजूबाजूला काम करणारे मजूर वाहून गेल्याची शंका

  उत्तराखंडमध्ये जोशीमठात हिमकडा कोसळल्याने धरण फुटल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये धरणाच्या आजूबाजूला काम करणारे मजूर वाहून गेल्याचं बोललं जात आहे.

 • 07 Feb 2021 12:30 PM (IST)

  जोशीमठात हिमकडा कोसळल्याने धरण फुटलं; 70-75 लोक वाहून गेल्याची भीती