दिल्लीत भूकंपाचे झटके, 10 सेकंदापर्यंत जाणवले धक्के, घरातून बाहेर आले नागरिक

Earthquake Today: दिल्लीसह उत्तर प्रदेशातील काही भागांत गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्का जाणावले. आग्रा, संभल, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले.

दिल्लीत भूकंपाचे झटके, 10 सेकंदापर्यंत जाणवले धक्के, घरातून बाहेर आले नागरिक
| Updated on: Jul 10, 2025 | 10:04 AM

Earthquake Today: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे १० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी सकाळी ९.०४ वाजता भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक, हिसार आणि सोनीपत या परिसरात जाणवले. भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपाचे केंद्र पृथ्वीच्या आता चार किलोमीटर होते. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ होती.

काही काळ मेट्रो सेवा थांबवली

भूकंप खूपच सौम्य होता. बहुतेक लोकांना तो समजू शकला नाही. परंतु काही घरे आणि दुकानांमध्ये बसलेल्या लोकांना दारे आणि खिडक्या हलताना दिसल्या. त्यामुळे त्या लोकांना भूकंप आल्याचे समजले. यानंतर लोकांनी एकमेकांना माहिती शेअर केली. सोशल मीडियातून ही माहिती वेगाने व्हायरल झाली. भूकंपामुळे मेट्रोही काही काळासाठी थांबवण्यात आली होती. या भूकंपामुळे कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

दिल्लीत सध्या पाऊस सुरु आहे. त्यावेळी भूकंपाचे धक्के जाणवले. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीसुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याच दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोक घाबरले आहेत. एनसीआरमधील लोकांना भूकंपांसोबत आवाज ऐकू आला. त्यामुळे लोक घाबरले आणि घरातून बाहेर आले.

भूकंप का येतो?

पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग हा १५ मोठ्या आणि लहान प्लेट्सने बनलेला आहे. या प्लेट्स स्थिर आहेत, असे नाही. त्या प्लेट्स इकडे तिकडे खूप हळू फिरतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर समोरासमोर फिरताना एकमेकांवर घासल्या जातात तेव्हा भूकंप होतो. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेच्या वेबसाइटनुसार, पृथ्वीखालील या प्लेट्स नेहमीच हळू हलतात. घर्षणामुळे त्या त्यांच्या कडांवर अडकतात. त्यामुळे कडांवर तणाव जास्त झाल्यावर उर्जा बाहेर पडते. जेव्हा ही उर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून लाटांच्या स्वरूपात जाते तेव्हा कंपन जाणवते. या कंपनाला भूकंप म्हणतात आणि ते रिश्टर स्केलवर मोजला जातो.