आएएस पूजा सिंघलला 17 तासांच्या चौकशीनंतर अटक; कोट्यवधींची रोकड जप्त, पूजा सिंगल चर्चेत असलेल्या अधिकारी

| Updated on: May 11, 2022 | 7:02 PM

ईडीकडून झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांची 17 तास चौकशी केली. तर त्यानंतर मंगळवारीही त्यांची 9 तास चौकशी केली. त्या 2000 बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांच्या याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आले आहेत

आएएस पूजा सिंघलला 17 तासांच्या चौकशीनंतर अटक; कोट्यवधींची रोकड जप्त, पूजा सिंगल चर्चेत असलेल्या अधिकारी
Follow us on

नवी दिल्लीः मनी लाँडरिंगच्या ((Money Laundering Case) आरोपात अडकलेल्या आएएस पूजा सिंघलला ईडीकडून केलेल्या 17 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ED) झारखंडच्या खाण सचिवाला (Secretary of Mines of Jharkhand) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. मनी लाँडरिंगच्या आरोपावरून ईडीने झारखंडच्या खाण सचिव असणाऱ्या पूजा सिंघल (IAS Pooja Singhal) यांची 17 तास तर मंगळवारी तपास यंत्रणेकडून त्यांची 9 तास चौकशी केली गेली आहे.

खुंटी येथील मनरेगा निधीमध्ये अपहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणासंदर्भात त्यांच्या पतीसह त्यांची ईडीकडून चौकशी केली गेली.

चर्चेत असलेले आयएएस अधिकारी

पूजा सिंघल आज पुन्हा एकदा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली. तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंग प्रकरणात 2000 बॅचच्या IAS अधिकारी पूजा सिंघल यांचे जबाब नोंदवले.

तरुण अधिकारी म्हणून प्रसिद्धीच्या झोतात

पूजा सिंघल 2000 बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. या कारवाईआधीही त्या याच प्रकरणामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्या ज्यावेळी अधिकारी झाल्या होत्या त्यावेळी त्या तरुण अधिकारी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या.

अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप

या आधीही त्यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. मात्र ज्या वेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यावेळी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले होते. आणि त्यांचा भ्रष्टाचार हा एवढ्या गांभीर्याने घेतला गेला नव्हता.

लग्नामुळेही त्या चर्चेत

तरुण वयात अधिकारी, त्यानंतर कोट्यवधींचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि आएएस अधिकाऱ्याबरोबर लग्न करुन पुन्हा घटस्फोट घेऊन पुन्हा एका व्यावसायिकाशी केलेल्या लग्नामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या. प्रशासनात त्या भडक माथ्याच्या अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.