चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाला ईडीचा जबरदस्त दणका; 55,571 कोटी जप्त होणार

ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई मानली जात आहे.

चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाला ईडीचा जबरदस्त दणका; 55,571 कोटी जप्त होणार
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 11:50 PM

दिल्ली : चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी शाओमी(Xiaomi India) ईडीच्या रडारवर आहे. शाओमी इंडियाला ईडीने जबरदस्त दणका दिला आहे. शाओमी 5 हजार 551 कोटींचा निधी आता ईडीने होल्ड केला आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने कंपनीविरोधात कारवाईचा बगडा उगारला आहे.

ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई मानली जात आहे. बनावट कागदपत्र तयार करून रॉयल्टीच्या नावाखाली शाओमीने ही रक्कम परदेशात पाठवल्याचा आरोप ईडीने केला आहे.

फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा कंपनीवर आरोप आहे. शाओमीचे 5,551 कोटी रुपये जप्त करण्याच्या ईडीच्या निर्णयाला फेमा प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. कर्नाटक हायकोर्टाने ईडीच्या कारवाईविरुद्ध शाओमीची याचिका फेटाळली होती.

2014 मध्ये शाओमी कंपनीने भारतीय मोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केला. दुसऱ्याच वर्षापासून शाओमीने रॉयल्टीच्या नावाखाली कोट्यवधींची रक्कम परदेशात पाठवण्यास सुरुवात केली होती.

शाओमी मुळची चिनी कंपनी आहे. मात्र, कंपनीकडून अमेरिकेतील दोन कंपन्यांनाही रॉयल्टी पाठवली जात होती. अमेरिकेतील ज्या रॉयल्टी पाठवली जात होती, त्या दोन्ही कंपन्यांचा शाओमीच्या भारतातील कामकाजाशी काहीही संबंध नसल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले.

कंपनीने बेकायदेशीरपणे पाठवलेल्या पैशाच्या संदर्भात या वर्षी फेब्रुवारीमध्ये ED ने Xiaomi विरुद्ध तपास सुरू केला होता. या कंपनीसाठी भारतीय मार्केट सर्वात मोठे आहे. अशा कंपनीच्या बाबतीत एवढी मोठी कारवाई ईडीकडून करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.