AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना झटका, इंडिया सिमेंटवर ईडीचा छापा

बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना मोठा झटका बसला आहे. श्रीनिवासन यांच्या मालकीची कंपनी इंडिया सिमेंटच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे

बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना झटका, इंडिया सिमेंटवर ईडीचा छापा
| Updated on: Feb 01, 2024 | 2:01 PM
Share

चेन्‍नई| 1 फेब्रुवारी 2024 : बीसीसीआयचे माजी चेअरमन एन श्रीनिवासन यांना मोठा झटका बसला आहे. श्रीनिवासन यांच्या मालकीची कंपनी इंडिया सिमेंटच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने चेन्नई येथे असलेल्या इंडिया सिमेंटच्या आवारात छापा टाकला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंट्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि उपाध्यक्ष आहेत. इंडिया सिमेंट ही देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपन्यांपैकी एक आहे. महसुलाच्या बाबतीत ही 9वी सर्वात मोठी सूचीबद्ध सिमेंट कंपनी आहे. त्यांच्या मुंबई तसेच चेन्नई येथील कार्यालयात छापे टाकण्यात आले आहेत

इंडिया सिमेंटचे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे 7 प्लांट आहेत. विशेष म्हणजे, 2008 ते 2014 पर्यंत, इंडिया सिमेंट्सकडे इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जची थेट मालकी होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी टीमने बीसीसीआय आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीवर छापा टाकला आहे. ईडीच्या टीमने चेन्नईतील इंडिया सिमेंट्सच्या ठिकाणांवर छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने चेन्नईशिवाय मुंबई तसेच श्रीनिवासन यांच्या इतर काही कार्यालयांवरही छापे टाकले असून तेथे तपास सुरू आहे. एन. श्रीनिवासन हे इंडिया सिमेंटचे उपाध्यक्ष आणि एमडी आहेत. ईडीच्या छाप्यामुळे एन. श्रीनिवासन यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होऊ शकते.

भ्रष्टाचाराविरुद्ध ईडीची मोहीम सुरूच

अंमलबजावणी संचालनालय भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सातत्याने कारवाई करत आहे. राजकारण्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत अनेक जण ईडीच्या रडारवर आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. जमीन घोटाळ्याच्या आरोपांमुळे हेमंत सोरेन यांना झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ते ईडीच्या ताब्यात आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने अद्याप त्याची अधिक चौकशी केलेली नाही.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.