AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस आमदाराच्या घरी घबाड! छापेमारीत सापडले 12 कोटींची रोख आणि सोनं चांदी; थेट तुरुंगात रवानगी

राजकीय नेत्यांची संपत्ती पाहून अनेकदा डोळे पांढरे होण्याची वेळ येते. काही वर्षात कोट्यवधींची माया जमवली जाते. त्यामुळे सर्व सामान्यांच्या मनात प्रश्न घर करून असतात. असंच एक प्रकरण ईडीने उघडकीस आणलं आहे. यात काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यवधींची माया आढळून आली आहे.

काँग्रेस आमदाराच्या घरी घबाड! छापेमारीत सापडले 12 कोटींची रोख आणि सोनं चांदी; थेट तुरुंगात रवानगी
काँग्रेस आमदाराच्या घरी घबाड! छापेमारीत सापडले 12 कोटींची रोख आणि सोनं चांदी; थेट तुरुंगात रवानगीImage Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Aug 23, 2025 | 7:05 PM
Share

काँग्रेस आमदाराच्या घरी कोट्यवधींची माया आढळल्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटकमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. तसेच इतर ठिकाणीही छापेमारी केली होती. या कारवाईत ईडीने 12 कोटीहून अधिक रोख आणि सोनं चांदी जप्त केलं आहे. यासह एक कोटींहून अधिकचे विदेशी चलन ताब्यात घेतलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली होती. अखेर ईडीने शनिवारी केसी वीरेंद्र यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. बंगळुरु ईडीने 22 आणि 23 ऑगस्ट रोजी देशभरात मोठी कारवाई केली. या कारवाईत त्यांनी भक्कम पुरावे हाती लागले. अनधिकृत सट्टेबाजी आणि ऑनलाईन गेमिंग रॅकेट या माध्यमातून त्यांनी उजेडात आणलं आहे. हे प्रकरण कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्याचे आमदार केसी वीरेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांशी निगडीत होते.

ईडीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार केसी वीरेंद्र काही ऑनलाईन बेटिंग साइट्स चालवायचा. यात त्याचा भाऊ केसी थिप्पास्वामी दुबईहून सूत्र हलवत होता. डायमंड सॉफ्टेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राइम 9 टेक्नॉलॉजीज या तीन कंपन्यांमार्फत काळे धंदे करत होता. दुसरा भाऊ के.सी. नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन. राज हे देखील या कामात सहभागी असल्याचे तपासात समोर आलं आहे. छाप्यांदरम्यान ईडीला अनेक महत्त्वाचे कागदपत्रे आणि पुरावेही सापडले आहेत. या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा धंदा सुरु होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने एकाच वेळी 31 ठिकाणी छापे टाकले होते. गोव्यातही ईडीने पपीज कॅसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कॅसिनो, पपीज कॅसिनो प्राइड, ओशन 7 कॅसिनो आणि बिग डॅडी कॅसिनो या पाच मोठ्या कॅसिनोवर छापे टाकले. ईडीने या छापेमारीतून 12 कोटींची रक्कम जप्त केली आहे. यात 1 कोटी अधिकचे विदेशी चलन आहे. तसेच 6 कोटींचं सोनं आणि 10 किलो चांदी आहे. यात चार लक्झरी गाड्याही आहे. या कारवाईत ईडीने 17 बँक खाती आणि दोन लॉकर गोठवली आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा