मोठी बातमी! ईडीच्या पथकावर थेट हल्ला, केरळमधील आक्रमक लोकांनी केलं लक्ष्य!

केरळममधून मोठी बातमी समोर येत आहे. येते ईडीच्या पथकावर तेथील हल्ला करण्यात आला आहे. हल्ला करणारे सीपीआय (एम) चे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी! ईडीच्या पथकावर थेट हल्ला, केरळमधील आक्रमक लोकांनी केलं लक्ष्य!
cpim
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2026 | 3:37 PM

Pinarayi Vijayan ED Raid : केरळममधून मोठी माहिती समोर येत आहे. तेथे ईडीच्या पथकावर थेट हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनसार केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली होती. ही छापेमारी चालू असताना विजयन यांच्या तिरुअनंतरपूरम येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. ईडीने आपली छापेमारी पूर्ण केली. त्यानंतर ईडीचे अधिकारी विजयन यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत होते. परंतु याच वेळी विजयन यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना गेटवरच रोखलं. मिळालेल्या माहितीनुसार या कार्यकर्त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यावर थेट दगडफेक केली आहे.

कार्यकर्त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना घेरलं

ईडीचे अधिकारी विजयन यांच्या निवासस्थानातून बाहेर आल्यानंतर सीपीआयएमच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना कार्यकर्ते प्रश्न विचारू लागले. परंतु याच वेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समोर येत कार्यकर्त्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले. परंतु बराच वेळ तिथे अशांततेचे वातावरण होते. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं प्रकरण काय?

इडीने केरळममध्ये एकूण 10 ठिकाणी छापेमारी केली. यात पिनराई विजयन यांचे निवासस्थान तसेच त्यांची कन्या वीणा विजयन यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. ही कारवाई कथित आर्थिक गैरव्यवाहाराशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. कोची येथील कोची मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या कंपनीला अवैध पद्धतीने पैसे देण्यात आले. या प्रकरणी 2025 साली सिरीयस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसने (SFIO) एक आरोपपत्र दाखल केले होचे. याच आरोपपत्रानंतर ईडीने ही कारवाई केली. SFIO ने वीणा विजयन यांची आयटी कंपनी एक्सालॉजिक सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरही गंभीर आरोप केले होते.

2019 साली समोर आले होते प्रकरण

या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण 2019 साली समोर आले होते. त्या साली प्राप्तिकर विभागाने CMRLच्या परिसरात मोठी छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर प्राप्तिकर विभागाने एक रिपोर्ट तयार केला होता. या रिपोर्टमध्ये वीणा विजयन यांच्या कंपनीशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीवर शंका उपस्थित करण्यात आली होती.

Follow Us