केंद्राचा मोठा निर्णय; खाद्यतेलाच्या किंमती आणखी 10 रुपयांनी घटणार; मागील महिन्यातही 20 रुपयांची घट

| Updated on: Aug 04, 2022 | 4:37 PM

मुंबईः सण समारंभाच्या प्रारंभीच सरकारकडून तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये 10 (Oil prices) रुपयापर्यंत दर कमी करण्याच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून (Central Government) जर हा निर्णय झाला तर सामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमती कमी होत असल्या तरी त्या आणखी कमी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सणसमारंभाच्या […]

केंद्राचा मोठा निर्णय; खाद्यतेलाच्या किंमती आणखी 10 रुपयांनी घटणार; मागील महिन्यातही 20 रुपयांची घट
Follow us on

मुंबईः सण समारंभाच्या प्रारंभीच सरकारकडून तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये 10 (Oil prices) रुपयापर्यंत दर कमी करण्याच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून (Central Government) जर हा निर्णय झाला तर सामान्य लोकांना याचा फायदा होणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमती कमी होत असल्या तरी त्या आणखी कमी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सणसमारंभाच्या काळात खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता आहे, तेलांच्या किंमती कमी करण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. खाद्यतेलांचे परीक्षण करण्यासाठी गुरुवारी खाद्य तेल कंपन्याबरोबर खाद्य विभागाच्या सचिवानी तेल कंपन्यांबरोबर बैठक बोलवण्यात आली आहे.

त्या बैठकीत सरकारकडून तेल कंपन्याना 10 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्याच्या सूचना देऊ शकतात असंही यावेळी सांगण्यात आले आहे.

सरकारच्या निर्णयाचा फायदा गोरगरीबांना

सरकारकडून जर हा निर्णय घेण्यात आला तर त्याचा फायदा देशातील अनेक गोरगरीब जनतेला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमतीत घसरण होत असली तरी सणसमारंभावेळी तेलाच्या किंमती आणखी कमी होणं म्हणजे नागरिकांसाठी ती फायदेशी असणार आहे.

सरकारच्या आदेश कंपन्यांनी पाळले

खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये घट करण्याचे प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहेत. त्याचबरोबर तेलकंपन्याना खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सरकारने सूचनी दिल्यानंतर 200 रुपयांनी विक्री होणारे खाद्य तेलाची किंमत त्यानंतर 160-170 इतकी झाली होती.

तेल कंपन्यांकडून 20 ते 25 रुपयांची घट

मागील महिन्यात तेल कंपन्यांकडून 20 ते 25 रुपयांची घट करण्यात आली होती. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे, त्याचाच फायदा छोट्या मोठ्या बाजारावरही होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 50 टक्क्यापर्यंत खाद्य तेलाच्या किंमती उतरल्या असल्याचे सांगण्यात आले आहे.