Corona Vaccine | 80 देशांचे राजदूत हैद्राबादला येणार, कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांचा दौरा करणार

| Updated on: Dec 05, 2020 | 5:11 PM

भारत बायोटेक आणि बीई लिमिटेड या कंपन्यांच्या दौऱ्यासाठी 80 देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त 9 डिसेंबरला हैद्राबाद येथे येणार आहेत.

Corona Vaccine | 80 देशांचे राजदूत हैद्राबादला येणार, कोरोना लस बनवणाऱ्या कंपन्यांचा दौरा करणार
Follow us on

हैद्राबाद : कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक आणि बीई लिमिटेड या कंपन्यांच्या दौऱ्यासाठी (Envoys Of 80 Countries Visit Hyderabad) जवळपास 80 देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त 9 डिसेंबरला हैद्राबाद येथे येणार आहेत. माहितीनुसार, शुक्रवारी (4 डिसेंबर) तेलंगणाचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी या उच्च स्तरीय यात्रेविषयी प्रोटोकॉल प्रमुख नागेश सिंह आणि राज्यातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. या दौऱ्यासाठी काय-काय व्यवस्था करण्यात येणार आहे, त्याविषयी देखील या बैठकीत चर्चा झाली (Envoys Of 80 Countries Visit Hyderabad).

“80 देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई-लिमिटेडमध्ये येतील. या कंपन्या कोव्हिड-19 च्या लशीवर काम करत आहे”, असं सरकारी परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. याबाबत, मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना या दौऱ्यादरम्यान कोरोना नियमांचं पालन करत व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असंही या परिपत्रकात नमुद करण्यात आलं आहे.

परिपत्रकानुसार, “परदेशी राजदुतांसाठी विविध सुविधा असलेल्या पाच बस आणि एक विशेष आरोग्य पथकाची व्यवस्था करण्यात येईल. तसेच, लसीची निर्मिती आणि पुरवठ्याबाबत राज्याची क्षमता दर्शविण्याकरिता एक सादरीकरणही केले जाईल. यामध्ये फार्मा सिटी आणि जीनोम व्हॅली यांचाही समावेश असेल”.

देशात चालणारं महत्त्वपूर्ण संशोधन आणि विकासविषयक उपक्रमांची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा दौरा आयोजित केला आहे, असंही परिपत्रकात सांगण्यात आलं आहे (Envoys Of 80 Countries Visit Hyderabad).

यापूर्वी गेल्या आठवड्यात शनिवारी (28 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लशीची निर्मिती केल्या जाणाऱ्या तीन शहरांना भेट दिली होती. यामध्ये हैद्राबाद आणि पुण्याचा समावेश होता. इथे मोदींनी कोरोना लशीच्या निर्मितीचा आढावा घेतला. त्यानंतर शुक्रवारी (4 डिसेंबर) मोदींनी सर्वपक्षीय बैठकी बोलावली होती. यामध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला. यावेळी मोदींना ‘मेड इन इंडिया’ कोरोना लशीबाबत माहिती दिली.

तसेच, येत्या काही आठवड्यातच कोरोना लस तयार होईल. वैज्ञानिकांनी हिरवा झेंडा दाखवताच देशात लसीकरण अभियानाला सुरुवात होईल, असंही मोदी म्हणाले.

Envoys Of 80 Countries Visit Hyderabad

संबंधित बातम्या :

BREAKING | फायझर-बायोएनटेक कोरोना लसीला मंजुरी देणारा पहिला देश ठरला UK! पुढील आठवड्यापासून वितरण सुरु

Corona Vaccine | ‘या’ देशातील नागरिकांना मोफत कोरोना लस मिळणार, पाकिस्तानचाही समावेश

दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस; नोंदणी सुरू

पंतप्रधान मोदींची कोरोना लसीबाबत मोठी घोषणा, लस कधी येणार? तिची किंमत काय? सगळ्यात आधी लस कुणाला टोचली जाणार? एका क्लिकवर सगळ्या प्रश्नाची उत्तरं!