धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तरी… रामदास आठवलेंचं मोठं विधान, काय घडतंय?
CJP Protest: पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असून यात चर्चा होऊ शकते असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नीट पेपर फुटी प्रकरणी सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आहे. पेपर लीक रोखण्यासाठी केंद्र सरकारन नवा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार आंदोलकांच्या मागण्यांचा सकारात्मक रुपाने विचार करत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळून लवकरच हे आंदोलन समाप्त होईल असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले प्रसारमाध्यमाशी बोलताना म्हणाले की सोनम वांगचुक उपोषण आंदोलनावर होते. त्यांचे वजन जवळपास ९ ते साडे नऊ किलो कमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले आहे.
चर्चेतून मार्ग नक्की सापडेल..
आठवले पुढे म्हणाले की बोलण्याने कोणत्याही मार्गावर तोडगा निघू शकतो. मला वाटते की अभिजित दीपके यांनाही यावर विचार करण्याची गरज आहे. आमचे म्हणणे आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा दिला तरी हा प्रश्न उरतोच की पेपर लिक कशी काय रोखली जाऊ शकते. यास रोखण्यासाठी सरकारने कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होऊ शकते. लवकरात लवकर हे आंदोलन संपायला हवे.
मागण्यांवर सरकार सकारात्मक – आठवले
“माझ्याकडे अजून संपूर्ण माहिती नाही, पण जर त्यांच्या मागण्यांवर चर्चा झाली, तर काही प्रमाणात तडजोड होऊ शकते. दोन्ही बाजूंनी समन्वय साधला जाऊ शकतो. सरकारही त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल. विद्यार्थ्यांनीही सरकारला सहकार्य केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी त्रास सहन करणे ही चांगली गोष्ट नाही. लवकरात लवकर यशस्वी वाटाघाटी व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.