AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ संवैधानिक वैधता तपासणार

ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या विविध पैलूंचा 6 सप्टेंबरला आढावा घेतला जाईल आणि 13 सप्टेंबरपासून याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊ, असे घटनापीठाने म्हटले आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणाची 13 सप्टेंबरपासून सुनावणी, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ संवैधानिक वैधता तपासणार
Supreme CourtImage Credit source: tv9
| Updated on: Aug 30, 2022 | 11:48 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या अर्थात ईडब्ल्यूएस आरक्षणा (EWS Reservation)च्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)त 13 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणी (Final Hearing) होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशातील गोरगरीब लोकांना उच्च शिक्षणाची तसेच सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांच्याच नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने या प्रकरणाची प्राधान्याने सुनावणी घेण्याची सहमती दर्शवली आहे.

ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या विविध पैलूंचा 6 सप्टेंबरला आढावा घेतला जाईल आणि 13 सप्टेंबरपासून याप्रकरणी अंतिम सुनावणी घेऊ, असे घटनापीठाने म्हटले आहे. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट, न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला यांचा समावेश आहे.

केंद्राच्या निर्णयाची घटनात्मक वैधता तपासणार

आर्थिक मागास प्रवर्गाला उच्च शिक्षण आणि सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मधील 103 व्या संवैधानिक दुरुस्ती कायद्यामध्ये तरतूद केली. केंद्राच्या या निर्णयाची घटनात्मक वैधता आम्ही तपासणार असल्याचे पाच सदस्यीय घटनापीठाने स्पष्ट केले.

आंध्र प्रदेश न्यायालयाच्या निकालाविरोधाती अपिलांवरही सुनावणी घेणार

आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिमांना सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) रुपात दिलेले आरक्षण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. त्या निकालाविरोधातील अपिलांवरही घटनापीठ नंतर सुनावणी घेणार आहे.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने चार न्यायाधीशांच्या निकालात या तरतुदी ‘स्टेट टू मुस्लिम कम्युनिटीज अ‍ॅक्ट’ 2005 अंतर्गत घटनाबाह्य घोषित केल्या. घटनापीठाने शादान फरासात, नचिकेता जोशी, महफूज नजकी आणि कानू अग्रवाल या चार वकिलांना नोडल वकील म्हणून काम करण्यास सांगितले आहे.

मुस्लिम SBEC आरक्षणाशी संबंधित प्रकरण 2005 चे दिवाणी आहे. ज्यामध्ये मुस्लिमांना एक समुदाय म्हणून संविधानाच्या कलम 15 आणि 16 अंतर्गत शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घोषित केले जाऊ शकते की नाही हा मुद्दा उपस्थित केला जातो. (EWS reservation will be heard in the Supreme Court from September 13)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.