भाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर मागील काही दिवसांमध्ये भाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचे गंभीर आरोप झाले आहेत.

भाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचा आरोप, Facebook इंडियाच्या अंखी दास यांचा राजीनामा

नवी दिल्ली : फेसबुक इंडियाच्या पॉलिसी हेड अंखी दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यावर मागील काही दिवसांमध्ये भाजपशी लागेबांधे असल्याचा आणि पक्षपाताचे गंभीर आरोप झाले आहेत. नुकतीच त्यांची संसदीय समितीनेही चौकशी केली होती. रॉयटर्स या वृत्तवाहिनेने आज (27 ऑक्टोबर) त्यांच्या राजीनाम्याचं वृत्त दिलं (Facebook India policy head Ankhi Das resigns after many allegations and parliamentary committee questioning).

नुकतेच भारतात फेसबुकवर पक्षपाताचा आणि द्वेषपूर्ण भाषणांवर कारवाई न करण्याचा आरोप झाला होता. या वादानंतर अंखी दास यांचं नाव चांगलंच चर्चेत आलं. त्यांच्यावर भाजपशी लागेबांधे असल्याचाही आरोप झालाय.

अंखी दास यांनी त्यांची फेसबुक आणि सरकारकडून झालेल्या चौकशीनंतर एक आठवड्याने राजीनामा दिलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर राजकीय पोस्टचं नियंत्रण कशाप्रकारे होते यावरुन फेसबुकवर काँग्रेससह विरोधी पक्षांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. भारतात फेसबुकचे 300 मिलियन पेक्षा अधिक वापरकर्ते आहेत.

मागील आठवड्यात अंखी दास यांची डाटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर संसदीय समितीने चौकशी केली होती. यावेळी त्यांची जवळपास 2 तास कसून चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा : ‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप

दरम्यान, ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या एका प्रतिष्ठित वृत्तपत्राने अंखी दास यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांच्या द्वेषपूर्ण भाषणांवर कारवाई न केल्याचं गंभीर वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यानंतर भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटले. यानंतर अंखी दास यांच्यावर जोरदार टीका झाली. संसदीय समितीसमोर चौकशीसाठी हजर होताना देखील अंखी दास एकट्या हजर झाल्या नाहीत. त्यांच्यासोबत त्यावेळी कंपनीचे बिजनेस प्रमुख अजीत मोहनही होते.

संबंधित बातम्या :

डाटा सुरक्षेच्या प्रश्नावर संसदीय समितीकडून फेसबुकच्या अंखी दास यांची 2 तास चौकशी

‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र

फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड

एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?

Facebook India policy head Ankhi Das resigns after many allegations and parliamentary committee questioning

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *