लग्नात पैसे मागायला आले नकली तृतीयपंथी, असली तृतीयपंथीयांनी धू..धू धुतले, Video
लग्न समारंभ असो की बारसं तृतीयपंथीय अशा समारंभाला हमखास येतात आणि ढोल वाजवून आशीर्वाद देतात. परंतू एका गावात लग्नात नकली तृतीयपंथीयांना असली तृतीयपंथीयांनी मारहाण केली.

तुतीयपंथीयांचा आशीर्वाद लागतो अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ समारंभात तृतीय पंथीयांना पैसे देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.आता तृतीयपंथीयांत देखील आता असली आणि नकली असे प्रकार आले आहेत. गावातील एका लग्नात आशीर्वाद देण्यासाठी किन्नर पोहचले. त्यानंतर हे किन्नर ( तृतीयपंथी ) नकली असल्याची कुणकुण लागली. त्यानंतर खरे तृतीयपंथी लग्नात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी या नकली तृतीयपंथीयांना चांगलीच वरात काढली. त्यांनी या नकली तृतीयपंथीयांना अक्षरश: कपडे काढून चोपले.
सुरत जिल्ह्यातील सरभोन गावात लग्नात आशीर्वाद देण्यासाठी दोन तृतीयपंथी पोहचले. हे तृतीयपंथी नकली असल्याचा संशय आल्याने गावातल्या लोकांनी त्यांची खऱ्या तृतीयपंथीयांना तक्रार केली. त्यानंतर या असली तृतीयपंथीयांना तेथे येऊन या नकली तृतीयपंथीयांची चांगलीच धुलाई केली. त्यांनी या नकली तृतीयपंथीयांना अक्षरश: कपडे काढून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे नकली तृतीयपंथी राजकोट येथील असल्याचे म्हटले जात आहेत.
सुरतच्या बारडोल तालुक्यातील सरभोन गावात एक अजब आणि वादग्रस्त घटना घडली आहे. लग्नाच्या समारंभात वराच्या घरात दोन नकली तृतीयपंथी मेकअप करुन आशीर्वाद देण्यासाठी पोहचले. गावातील काही लोकांना त्यांचा संशय आला. त्यांनी लागलीच बारडोली येथे राहणाऱ्या असली तृतीयपंथीयांना ही बातमी दिली. त्यानंतर असली तृतीयपंथी लागलीच सरभोन गावात पोहचले.त्यानंतर त्यांनी त्या नकली तृतीयपंथीयांना लागलीच ओळखले आणि त्यांची येथेच्छ धुलाई करण्यास सुरुवात केली. गावातील लोक स्थानिक तृतीयपंथी पूनम मावशी आणि अन्य असली तृतीयपंथीयांना ओळखत होते.जेव्हा पैसे मागायला आलेले तृतीयपंथी असली नाहीत असा संशय आला तेव्हा त्यांनी पूनम मावशी आणि तिच्या साथीदारांना पाचारण केले.
जास्त रक्कम मागितल्याने संशय आला
ही माहिती मिळताच पूनम मावशी आणि त्यांचे साथीदार सरभोन गावात आले. त्यांनी त्या दोघा नकली तृतीयपंथीयांना जमीनीवर बसवले आणि त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर त्यांनी सांगितले की ते राजकोटचे राहणारे असून पैसे कमावण्यासाठी तृतीयपंथी बनून गावात आल्याचे कबुल केले. या तृतीयपंथीयांनी जास्त रक्कम मागितली होती. त्यामुळे गावकऱ्यांना संशय आला. आणि त्यांनी असली तृतीयपंथीयांना खबर दिली.
येथे पोस्ट पाहा –
पुरुष बने थे नकली किन्नर, भंडाफोड़, असली किन्नरों ने पकड़कर पीटा, सूरत के बारडोली के सरभों गांव के लोगों को शक होने पर असली किन्नरों को बुलाया, पता चला कि दोनों नकली थे।#suratnew #sürat #nesalert #kinner #sixer #bardoli #reelsındia #reelsi̇nstagram #foryoü #foryoupage pic.twitter.com/fK0z996rrb
— R Samachar (@samachar_r98826) December 7, 2025
या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की दोन्ही नकली तृतीयपंथीयांना जमीनीवर बसवले आहे आणि असली तृतीयपंथी त्यांना प्रश्न करत आहेत. त्यानंतर असली तृतीयपंथीयांनी दोघा नकली तृतीयपंथीयांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण सुरु केली, एवढेच काय त्यांचे कपडे देखील काढण्यात आले. नकली किन्नर हात जोडून माफी मागताना दिसत आहेत.
