प्रसिद्ध पावभाजी विक्रेता तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात, पाहा कुठून आजमावताय नशीब

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक जण आपलं नशीब आजमावत आहेत. यामध्ये एका पावभाजी विकणाऱ्या उमेदवाराची देखील चर्चा आहे. पावभाजीच्या चवीसाठी प्रसिद्ध असणारी ही व्यक्ती आता पुन्हा एकदा निवडणूक लढवत असल्याने देखील चर्चेत आहे. कोण आहेत ते जाणून घ्या.

प्रसिद्ध पावभाजी विक्रेता तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात, पाहा कुठून आजमावताय नशीब
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 3:58 PM

Loksabha Elecction : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक मोठे नेते निवडणुकीच्या मैदानात आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता श्रीमंत आणि गरीब उमेदवारांची ही चर्चा आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एक पावभाजी विकणारा उमेदवारही चर्चेत आलाय. प्रसिद्ध पावभाजी वाले हे लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पावभाजी विक्रेते कुशेश्वर भगत पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत. पण ही त्यांची पहिलीच वेळ नाही. कुशेश्वर यांनी यापूर्वी दोनदा राष्ट्रपतीपदाची, तीनदा लोकसभा आणि दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. मात्र प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. आता पुन्हा एकदा ते अपक्ष निवडणूक लढवत आहेत.

पावभाजीचा व्यवसाय

कुशेश्वर भगत हे गुरुग्रामच्या सिव्हिल लाईन्स भागात पावभाजीचा व्यवसाय करतात. त्यांच्या पावभाजीची चव प्रसिद्ध आहे. पावभाजी खाण्यासाठी लांबून लोकं येतात. पावभाजी विकता विकता त्यांना निवडणुकीत नशीब आजमावण्याचा विचार आला आणि त्यांनी बऱ्याच वेळा निवडणुकीचा अर्ज भरला. आता ते लोकसभा निवडणुकीतही नशीब आजमावत आहेत. त्यामुळे त्यांना यश मिळतं की नाही हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. आपण 12 लाख मतांनी विजयी होऊन जनतेची सेवा करणार असल्याचा दावा कुशेश्वर भगत यांनी केलाय.

गुरुग्रामच्या लोकांना बदल हवाय. मतदारसंघात अनेक समस्या आहेत. पण जनतेची काळजी घेणारे कोणी नाही. 20 वर्षे राज्य करणाऱ्या नेत्यांमुळे गुरुग्रामच्या जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, आता लोकांना बदल हवा आहे, असे ते म्हणत आहेत.

तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात

हरियाणातील गुरुग्राम लोकसभा मतदारसंघातून 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी एक नाव म्हणजे कुशेश्वर भगत. त्यांनी याआधी तीन वेळा लोकसभा, दोन वेळा विधानसभा आणि दोन वेळा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. पावभाजीचा व्यवसाय करणारे कुशेश्वर भगत त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

गुरुग्राम मतदारसंघात सहाव्या टप्प्यात म्हणजेच २५ मे रोजी लोकसभा निवडणूक होणार आहे. भाजपने पुन्हा एकदा येथून विद्यमान खासदार राव इंद्रजित सिंग यांना तिकीट दिले आहे. कुशेश्वर भगत हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. जनतेचा मला पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे कुशेश्वर सांगतात. त्यामुळे यावेळी जनता अपक्ष उमेदवाराला विजयी करेल असा त्यांना विश्वास आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.