AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यात होते 8400 रुपये अन् जमा झाले एक कोटी

farmer story | भारतीय स्टेट बँकेत एका शेतकऱ्याचे वृद्ध पेन्शन योजनेचे खाते आहे. या खात्याचे पासबुक चार, पाच महिन्यांपासून भरले नव्हते. त्या शेतकऱ्याने पासबुक बँकेतून भरुन आणण्यासाठी मुलाकडे दिले. मुलाने जेव्हा पासबुक भरुन आणले आणि शेतकऱ्याने पहिले तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला.

वृद्ध शेतकऱ्याच्या खात्यात होते 8400 रुपये अन् जमा झाले एक कोटी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 30, 2023 | 1:58 PM
Share

रांची, दि. 30 डिसेंबर 2023 | बँकेच्या खात्यात कधी दहा हजारापेक्षा जास्त रक्कम नसताना एक कोटी रुपये आले तर काय होणार? त्या व्यक्तीला हे पैसे कसे आले ? याचा धक्का बसणार, हे निश्चित. कधी बँकेकडून चुकीने टाकली गेली रक्कम असेल तर ती पुन्हा वर्ग केली जाते. एका 75 वर्षीय शेतकऱ्याचे भारतीय स्टेट बँकेत बचत खाते आहे. त्याचे वृद्ध पेन्शन योजनेचे हे खाते आहे. त्या खात्याचे पासबुक गेली चार, पाच महिन्यांपासून भरले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्याने पासबुक बँकेतून भरुन आणण्यासाठी मुलाकडे दिले. मुलाने जेव्हा पासबुक भरुन आणले आणि शेतकऱ्याने पहिले तेव्हा त्याला प्रचंड धक्का बसला. कारण बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये जमा झाले होते. बिहारमधील भागलपूर येथील शेतकरी संदीप मंडल यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला.

बँकेने खाते केले फ्रीज

संदीप मंडल यांनी आपल्या खात्यात एक कोटी आल्याची माहिती बँकेला जाऊन दिली. बँकेने त्वरित त्याचे खाते फ्रीज केले. त्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बँकेने सायबर पोलिसांकडून रिपोर्ट आल्यावर खाते पुन्हा सक्रीय करणार असल्याचे म्हटले आहे.

खात्यात होते 8400 झाले एक कोटी

संदीप मंडल यांचे एसबीआयमधील खात्यात वृद्ध पेन्शन आणि पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे निधी येतो. या खात्यात एक कोटी आले कसे, यासंदर्भात आपणास काहीच माहिती नसल्याचे शेतकरी संदीप मंडल यांनी सांगितले. आपण ऑगस्ट महिन्यात पासबुक अपडेट केले होते. त्यावेळी खात्यात 8400 रुपये होते. त्यानंतर पासबुक अपडेट केले नाही. खात्यात एक कोटी रुपये आल्यानंतर बँकेने खाते फ्रीज करत सायबर पोलिसांकडे तक्रार देण्याचे सांगितले. त्यानुसार तक्रार देण्यात आली आहे, असे संदीप मंडल यांनी म्हटले. डीएसपी सुनील कुमार पांडे यांनी म्हटले की, शेतकऱ्याच्या खात्यात एक कोटी रुपये आले कसे? याची चौकशी सुरु केली आहे. बँकेने त्यांचे खाते गोठवले आहे. बँकेकडून आम्हाला यासंदर्भात पत्र मिळाले आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!