प्रेमविवाहानंतर ती अचानक घरातून गायब झाली…नंतर जे सत्य उघड झाले त्याने गाव हादरले

आपल्या मुलाने प्रेमविवाह केला हे पसंद नसल्याने मुलाच्या बापाने आपल्या सूनेचा छळ सुरु केला होता. आणि त्याची सून घरातून गायब झाली...परंतू अखेर धक्कादायक सत्य उघडकीस आले.

प्रेमविवाहानंतर ती अचानक घरातून गायब झाली...नंतर जे सत्य उघड झाले त्याने गाव हादरले
crime news file photo
| Updated on: Dec 12, 2025 | 8:31 PM

दोघांनी प्रेम विवाह केला आणि त्यानंतर त्यांचा गोडी गुलाबीने संसार सुरु झाला. मुलाने प्रेम विवाह केल्याने आधी नाराजी व्यक्त करणाऱ्या घरच्यांनी देखील नंतर त्यांना स्वीकारल्यानंतर सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक घरातील सून बेपत्ता झाली. एक महिनाभर पत्नीचा शोध पतीने केला, परंतू काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अखेर एक महिन्याने सत्य उघडकीस आले त्यावेळी या पतीच्या पायाखालची जमीनच सरकली…

मिळालेल्या माहितीनुसार घरातील सून अनेक दिवस दिसली नसल्याने गावात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली होती. पतीने आपल्या या पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसात ती हरवल्याची तक्रार दाखल केली. परंतू एक महिनाभर काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे गावातील लोक संशय घेऊ लागले. परंतू कोणाच वाटले नव्हते ही रहस्य या घरातच आहे.

छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बांधा टोला गावातील एका सासऱ्याला मुलाचा प्रेम विवाह पसंत नव्हता, त्यामुळे त्याने सूनेची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पुरावा मिठवण्यासाठी सूनेचा मृतदेह घराच्या सेप्टीक टँकमध्ये लपवला आणि महिनाभर तो शांत राहिला.

सासरा पोलिस ठाण्यात गेला…

या घटनेला धक्कादायक वळण तेव्हा लागले जेव्हा आरोपी सासरा जहल पटेल याने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची थेट कबुली दिली. त्याने सांगितले की मुलाचा प्रेम विवाह त्याला पसंद नव्हता. कारण मुलगी दुसऱ्या समाजाची होती. त्यामुळे त्याने चिडून जाऊन सूनेची हत्या केली. आणि मृतदेह घराच्या सेप्टीक टँकमध्ये लपवला.

त्यांनी सेप्टीक टँक उघडला….

पोलिसांची टीम लागलीच आरोपीच्या घरात पोहचली आणि त्यांनी सेप्टीक टँक उघडला. टँक उघडताच सूनेचा सडलेला मृतदेह बाहेर आला. हे दृश्य पाहून पोलिसांसह उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. संपूर्ण गावाला यामुळे धक्का बसला. पोलिसांनी आरोपी सासऱ्याला लागलीच अटक केली. या मृतदेहाचे पोस्ट मार्टेम केले जाणार आहे. प्रेमविवाहाच्या विरोधात ही हत्या झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.