पाकिस्तानात दीड टन एसीची किंमत किती? भारतापेक्षा प्रचंड महाग

भारतात उष्णतेपासून आराम देणारा एअर कंडिशनर कोणत्या किंमतीत मिळतो, हे तुम्हाला माहितीच आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का की शेजारील देशात दीड टनचा एअर कंडिशनर नेमका कोणत्या किंमतीत विकला जातो?

पाकिस्तानात दीड टन एसीची किंमत किती? भारतापेक्षा प्रचंड महाग
Pakistan AC
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 29, 2025 | 4:01 PM

पाकिस्तानात महागाई जास्त असल्याने तिथे रोजच्या वापरातील वस्तूंपासून ते घरगुती उपकरणांपर्यंत सर्व काही भारताच्या तुलनेत खूपच महाग आहे. प्रत्येकजण सांगतो की पाकिस्तानात कोणती गाडी कितीला विकली जाते, पण तुम्हाला हे माहिती आहे का की शेजारील देशात दीड टनचा एसी कोणत्या किंमतीत विकला जातो?

पाकिस्तानातील दीड टन एसीची किंमत

पाकिस्तानात दीड टनच्या एअर कंडिशनरची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. टीसीएल पाकिस्तानच्या अधिकृत वेबसाइटवर दीड टनचा (18HEA-2) एसी PKR 148,900 (अंदाजे 45,251 रुपये) ला विकला जात आहे. तर मेगा डॉट पीके वेबसाइटवर Haier कंपनीचा दीड टनचा एसी PKR 149,999 (अंदाजे 45,585 रुपये)ला मिळतो.

वाचा: ‘याचा अर्थ तुम्ही नालायक…’, पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करताना शाहिद आफ्रीदीने ओलांडल्या मर्यादा

पाकिस्तानात या कंपन्या विकतात एसी

पाकिस्तानात टीसीएल, Haier यांच्यासह Kenwood, GREE सारख्या कंपन्या एअर कंडिशनर विकतात.

पाकिस्तानात 1.5 टन एसीची किंमत

पाकिस्तानी वेबसाइट Daraz वर Kenwood कंपनीचा दीड टनचा एअर कंडिशनर PKR 150,499 (अंदाजे 45,737 रुपये) ला मिळतो. तर मेगा डॉट पीके वेबसाइटवर Gree कंपनीचा 1.5 टनचा स्प्लिट एसी PKR 211,999 (अंदाजे 64,427 रुपये) ला विकला जात आहे.

भारतातील दीड टन एसीची किंमत

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर दीड टनचा नवीन एअर कंडिशनर तुम्हाला 30 हजार रुपयांपेक्षा कमी सुरुवातीच्या किंमतीत मिळेल. फ्लिपकार्टच्या स्वतःच्या ब्रँड Marq चा दीड टनचा एसी 25,990 रुपयांना विकला जात आहे. याशिवाय Onida कंपनीचा दीड टनचा एसी 28,490 रुपयांना मिळतो. तर दुसरीकडे अॅमेझॉनवर क्रूज कंपनीचा दीड टनचा एसी 28,990 रुपयांना विकला जात आहे.

भारतीय बाजारात या कंपन्यांव्यतिरिक्त व्होल्टास, सॅमसंग, एलजी, हिताची, ब्लू स्टार, Lloyd, Haier, डायकीन यासारख्या अनेक कंपन्या एसी विकतात. पण या सर्व कंपन्यांच्या दीड टनच्या एसींच्या किंमती 30 हजार रुपयांपेक्षा जास्त आहेत.