Noida Crime : पती-पत्नीचा वाद, पित्याकडून मुलीवर अत्याचार, आयटी इंजिनिअर आरोपीला अटक

पतीने पाच वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बोट घातल्याचा आरोप महिलेने केला होता. मुलीने आंघोळ करताना तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याचे आईला सांगितले. यानंतर आईने मुलीकडे सखोल चौकशी केली असता मुलीने वडिलांच्या कृत्याबद्दल आईला सांगितले.

Noida Crime : पती-पत्नीचा वाद, पित्याकडून मुलीवर अत्याचार, आयटी इंजिनिअर आरोपीला अटक
कन्हैयालाल हत्याकांडाच्या समर्थनार्थ अल्पवयीन मुलीची पोस्ट
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 30, 2022 | 7:12 PM

नवी दिल्ली : पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पित्याने स्वतःच्याच 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार (Abused) केल्याची घटना ग्रेटर नोएडामध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन बिसरख कोतवाली पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी पित्या (Father)ला अटक केले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. आरोपी उच्चशिक्षित असून एका आयटी कंपनीत अभियंता (Engineer) आहे. तर मुलीची आई एका मेडिकल स्टोअरमध्ये नोकरी करते. याप्रकरणी बिसरख कोतवाली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलीने आईला वडिलांचे दुष्कृत्य सांगितल्यानंतर गुन्हा दाखल

बिसरख कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडा वेस्टमधील एका सोसायटीत राहणाऱ्या महिलेने तिच्या पतीविरुद्ध डिजिटल बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पतीने पाच वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बोट घातल्याचा आरोप महिलेने केला होता. मुलीने आंघोळ करताना तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होत असल्याचे आईला सांगितले. यानंतर आईने मुलीकडे सखोल चौकशी केली असता मुलीने वडिलांच्या कृत्याबद्दल आईला सांगितले. पोलिसांच्या चौकशीतही मुलीने घडला प्रकार सांगितला. सोमवारी पोलिसांनी न्यायालयात मुलीचा जबाब नोंदवला. मुलाच्या जबाबाच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.

उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलांकडून 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

शेतावर बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील शाहजहापूरमध्ये उघडकीस आली आहे. मुलगी घरी आली तेव्हा तिचे कपड रक्ताने माखलेले होते. आईने तिला याबाबत विचारले असता तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपींच्या वयाचे व्हेरिफिकेशन सुरु आहे. यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. (Five years old girl abused by engineer father in Greater Noida over marital dispute)

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें