AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक लँडिंग फेल, विमान हवेतच…अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर; प्रवाशांसोबत काय घढलं?

फ्लाय९१ एअरलाइन्सचे विमान आयसी३४०१ (IC3401) जवळपास चार तास हवेत घिरट्या घालत होते. प्रत्येक क्षण प्रवाशांची चिंता वाढवत होता. विमानाच्या आतील व्हिडीओ समोर आले आहेत.

अचानक लँडिंग फेल, विमान हवेतच...अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर; प्रवाशांसोबत काय घढलं?
Fly91Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 20, 2026 | 3:30 PM
Share

अनेकजण लांबचा प्रवास करण्यासाठी आणि लवकरात लवकर पोहोचण्यासाठी विमानाने जाण्याचा पर्याय निवडतात. रेल्वे किंवा इतर वाहनांद्वारे लांबचा प्रवास करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे विमान प्रवास हा सुखर आणि लवकरात लवकर पोहोचवणार असतो. पण आजकाल विमानात होणारे बिघाड आणि अपघात वाढल्यामुळे अनेकांना प्रवासामध्ये भीती वाटते. फ्लाय९१ एअरलाइन्सची फ्लाइट IC3401 सोबत असाच भयानक प्रकार घडला. तांत्रिक बिघाडामुळे पायलटला लँडिंग रद्द करावी लागली आणि विमान दीर्घकाळ आकाशातच घिरट्या घेत राहिलं.

कुठून निघालं होतं विमान?

मिळालेल्या माहितीनुसार, ही फ्लाइट दुपारी सुमारे ३ वाजता राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट (हैदराबाद) वरून निघाली होती आणि सायंकाळी ४:३० वाजता हुबळी एअरपोर्टवर लँड होणार होती. मात्र, लँडिंगच्या अगोदरच विमानात तांत्रिक बिघाड झाला. परिस्थिती पाहता पायलटने तातडीने लँडिंग रद्द केले आणि विमान सुरक्षित उंचीवर ठेवले.

त्यानंतर सुमारे चार तास विमान हवेतच घिरट्या घेत राहिले. या दरम्यान ते मुंडगोड, दावणगेरे आणि शिवमोग्गा येथे आकाशात घिरट्या घालत होते. यामागे तांत्रिक समस्या समजून घेणे आणि इंधन नियंत्रित पद्धतीने कमी करणे हे उद्दिष्ट होते. प्रत्येक मिनिटागणिक प्रवाशांची अस्वस्थता वाढत होती. या दरम्यान विमानातील व्हिडीओही समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की अनेक प्रवासी घाबरून रडत-ओरडत आहेत, तर काही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर शेवटी विमान डायव्हर्ट करून केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट (बंगळुरू) वर नेले गेले, जिथे ते सायंकाळी सुमारे ७:३० वाजता सुरक्षित उतरले. लँडिंग झाल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

विमानातील वातावरण या काळात अत्यंत तणावपूर्ण होते. अनेक प्रवासी घाबरून प्रार्थना करू लागले, तर काही भावुक होऊन रडू लागले. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येकजण सुरक्षित उतरण्याच्या आशेने बसला होता आणि चार तासांचा हा काळ एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नव्हता. सध्या एअरलाइन्सकडून तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी सुरू आहे. मात्र वेळीच पायलटनी घेतलेल्या निर्णय आणि सावधपणामुळे मोठा अपघात टळला. तसेच सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...