निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला दिले हे चिन्ह, ऋताब्रत रॉय यांनाही..
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला चिन्ह वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने टीएमसी पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

पश्चिम बंगालमधील सत्ता गमावल्यानंतर ममता बॅनर्जी यांना अत्यंत मोठा धक्का बसला आहे. थेट तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले. विधानसभा निवडणुकीत मोठी फूट पक्षात पडली. एक एक करून नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. दोन्ही पक्षांनी हा पक्ष आमचाच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता ममता बॅनर्जी आणि ऋताब्रत रॉय यांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह निवडण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ऋताब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटांसाठी नवीन नावे जाहीर केली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असे नाव देण्यात आले आहे, बंडखोरी केलेल्या ऋताब्रत रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस असे नाव देण्यात आले.
ममता बॅनर्जी यांना एका मागून एक धक्के बसताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्हे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला फुटबॉला खेळाडू चिन्ह देण्यात आले. ऋताब्रत रॉय यांच्या पक्षाला लिफाफा हे चिन्ह देण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड मोठा वेग आल्याचे बघायला मिळतंय.
त्यातच निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात मोठी फूट पडली. या फुटीनंतर दोन्ही बाजूकडून मोठा दावा करण्यात आला. हे प्रकरण थेट निवडणूक आयोगापर्यंत जाऊन पोहोचले. त्यानंतर निवडणूक आयोगाने टीएमसी पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसशी संबंधित वादात दोन्ही पक्षांना बंगालमधील आगामी पोटनिवडणुकांसाठी पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही.
पक्षाचे चिन्ह आणि नाव गोठवण्यात आले. निवडणूक आयोगाने या प्रकरणात अंतरिम आदेश दिली आहेत. हीच परिस्थिती शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती, त्यावेळी घडली होती. मात्र, त्यावेळी पक्षाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. त्या प्रकरणात सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.
