जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे दिल्लीत निधन

पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित जगमोहन हे केंद्रीय मंत्रीही होते. | Former Jammu Kashmir Governor Jagmohan

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे दिल्लीत निधन
| Updated on: May 04, 2021 | 8:15 AM

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या जगमोहन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांनी 1984-89 आणि जानेवारी-मे 1990 अशा दोनवेळेला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भुषविले होते. या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त होती. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या टीकेनंतर जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून हटवण्यात आले होते. (Former Jammu Kashmir Governor Jagmohan Passed away in Delhi )

जगमोहन यांनी 1996 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सांभाळली होती.

(Former Jammu Kashmir Governor Jagmohan Passed away in Delhi )