नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये मोठा बदल, या व्यक्तीला निवृत्तीनंतर मिळाली सर्वात मोठी जबाबदारी

Former RBI Governor Shaktikanta Das: आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दास यांनी अनेक महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देत आरबीआयचे नेतृत्व केले. कोविड-19 महामारीच्या वेळेस ते आरबीआयचे गव्हर्नर होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 

नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये मोठा बदल, या व्यक्तीला निवृत्तीनंतर मिळाली सर्वात मोठी जबाबदारी
Narendra Modi
| Updated on: Feb 22, 2025 | 7:10 PM

Former RBI Governor Shaktikanta Das: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये मोठा बदल झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांना नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव करण्यात आले आहे. शक्तीकांत दास डिसेंबर महिन्यात गव्हर्नर म्हणून सहा वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्त झाले होते. निवृत्तीच्या काही महिन्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. सध्या पी.के. मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव 1 आहेत. आता त्यानंतर शक्तीकांत दास प्रधान सचिव 2 च्या भूमिकेत दिसणार आहे. शक्तीकांत दास 1980 बँचचे आयएएस अधिकारी आहे.

काय आहे नियुक्ती आदेशात

कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने शक्तीकांत दास यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहे. त्यात म्हटले आहे की, दास यांची नियुक्ती प्रधानमंत्री यांच्या कार्यकाळ असेपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत जे सर्वात आधी होईल, तोपर्यंत असणार आहे. शक्तीकांत दास प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रासोबत प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम करणार आहे.

चार दशके शासनामध्ये विविध पदांवर

शक्तीकांत दास डिसेंबर 2018 पासून सहा वर्षांपर्यंत आरबीआयचे प्रमुख राहिले. त्यांना चार दशकांचा विविध शासकीय सेवेचा अनुभव आहे. त्यांनी वित्त, कर आकारणी, उद्योग, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. महसूल विभाग आणि आर्थिक व्यवहार विभागाचे सचिवही राहिले आहेत. आपल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात दास यांनी अनेक महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देत आरबीआयचे नेतृत्व केले. कोविड-19 महामारीच्या वेळेस ते आरबीआयचे गव्हर्नर होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

दास यांनी त्यांच्या 6 वर्षांच्या आरबीआयमधील कार्यकाळातील शेवटच्या 4 वर्षांत आर्थिक विकास दर 7 टक्क्यांपेक्षा जास्त राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आरबीआयमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांना 15 व्या वित्त आयोगाचे सदस्य आणि भारताचे G20 शेर्पा म्हणून नियुक्त करण्यात आले. 26 फेब्रुवारी 1957 रोजी तामिळनाडूमध्ये शक्तीकांत दास यांचा जन्म झाला.