AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाद्यपदार्थात आढळली उंदरांची विष्ठा, जिंवत पाल, 2 कंपन्यांना मोठा दणका; FSSAI ची धडक कारवाई!

महाराष्ट्रातील एका कंपनीच्या युनिटमध्ये बेसनाचे पीठ हातमोजे न वापरता मळले जात असल्याचे आढळले. सडलेल्या कचऱ्याजवळ जमिनीवर केळी सोलली जात होती.

खाद्यपदार्थात आढळली उंदरांची विष्ठा, जिंवत पाल, 2 कंपन्यांना मोठा दणका; FSSAI ची धडक कारवाई!
fssai food safetyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 9:17 PM
Share

FSSAI Action : महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यामुळे काही हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचेही परवाने काही काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. असे असतानाच आता देशात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

खाद्यपदार्थांची निर्मिती करताना नियमांचे उल्लंघन

मिळालेल्या माहितीनुसार परवाना रद्द करण्यात आलेली एक कंपनी ही उत्तर प्रदेशातील आहे. तर दुसरी कंपनी ही महाराष्ट्रातील आहे. FSSAI ने पाहणी केल्यानंतर या दोन्ही कंपन्यांमध्ये खाद्यपदार्थांची निर्मिती करताना नियमांचे पालन केले नसल्याचे आढळले. तसेच कंपनीच्या युनिटमध्ये अतिशय घाण, अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. खाद्यपदार्थांमध्ये जिवंत कीटक, बुरशी, उंदरांची विष्ठा तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आढळल्याने दोन्ही कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.

खाद्यपदार्थांच्या आसपास माशांचा वाव

FSSAI च्या तपासणीदरम्यान उत्तर प्रदेशमधील कंपनीत साठवलेल्या पिस्त्यांमध्ये जिवंत कीटक आढळले. याशिवाय स्टोरेज परिसरातील भिंती आणि छतावर मोठ्या प्रमाणात काळी बुरशी दिसून आली. काही ठिकाणी उंदरांची विष्ठाही दिसली. यंत्रांवर गंज, खराब फरशी आणि खाद्यपदार्थांच्या आसपास माशांचा वावर असल्याचेही समोर आले. विशेष म्हणजे अंजीर साठवलेल्या ठिकाणी जिवंत पाल आढळली. कर्मचाऱ्यांकडूनही स्वच्छता आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे तपासणीत समोर आले आहे. नियमांचे पालन करण्यात संबंधित युनिटला केवळ 38 टक्के गुण मिळाले. त्यामुळे या कंपनीचा परवाना अंशतः निलंबित करण्यात आला.

महाराष्ट्रातील कंपनीलाही मोठा दणका

महाराष्ट्रातील एका कंपनीच्या युनिटमध्ये बेसनाचे पीठ हातमोजे न वापरता मळले जात असल्याचे आढळले. सडलेल्या कचऱ्याजवळ जमिनीवर केळी सोलली जात होती. तेलाच्या टाक्यांभोवती बुरशी, प्रक्रिया विभागात साचलेले दूषित पाणी आणि तुटलेल्या कीटकप्रतिबंधक जाळ्याही आढळल्या. कंपनीच्या या युनिटला तपासणीत 42 टक्के गुण मिळाले. यापूर्वीही कंपनीच्या काही खाद्य नमुन्यांमध्ये असुरक्षितता किंवा चुकीचे लेबलिंग आढळले होते. त्यानंतर FSSAI ने या कंपनीचाही परवाना निलंबित केला आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा