AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gas Cylinder Price : घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडी, वर्षाला 12 सिलेंवर योजना लागू, 9 कोटी जनतेला फायदा

घरगुती गॅस सिलेंडरसाठी 200 रुपये सबसिडी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ही योजना वर्षाला 12 सिलेंडरसाठी लागू असेल. याचा फायदा देशातील 9 कोटी जनतेला होणार आहे.

Gas Cylinder Price : घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडी, वर्षाला 12 सिलेंवर योजना लागू, 9 कोटी जनतेला फायदा
घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडीImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: May 21, 2022 | 7:33 PM
Share

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महागाईने (Inflation) हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) , गॅस सिलेंडरबाबत (Gas Cylinder Price) आज मोठे निर्णय झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरसाठी 200 रुपये सबसिडी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ही योजना वर्षाला 12 सिलेंडरसाठी लागू असेल. याचा फायदा देशातील 9 कोटी जनतेला होणार आहे. तसेच पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाईवरून जनता तक्रारी करत आहे. तसेत विरोधकांकडूनही केंद्र सरकारवर जोरदार टीकाही होत आहे. महागाईविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. महिलांना घरगुती गॅस परवडत नसल्याने त्यांनी रस्त्यावर चुली मांडून आंदोलनं केली. हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

आता घरगुती गॅस सिलिंडर किती रुपयांना पडणार?

शहर             आधीची किंमत         नवे दर लागू झाल्यास

मुंबई              1002.50 रुपये         802.50 रुपये

दिल्ली            1003 रुपये               8003 रुपये

कोलकाता     1029 रुपये                829 रुपये

चेन्नई             1018.50 रुपये           818.50 रुपये

निर्मला सितारामण काय म्हणाल्या

देशात वाढलेल्या महागाईने गृहीणीही बेजार झाल्या होत्या. पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ त्यांच्यावर आली होती.  मात्र आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर प्रमाणे वर्षाला 12 सिलिंडरला सबसिडी मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. आम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडर) सबसिडी दिली जाणार. यामुळे आमच्या माता-भगिनींना मदत मिळेल, असं असे त्यांनी जाहीर केली आहे.

पेट्रोल डिझेलबाबातही मोठा दिलासा

सध्या पेट्रोलने 120 रुपये तर डिझेलनेही कधीच शंभरी पार केल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. मात्र हेच दर 7 ते आठ रुपयांनी कमी होणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे अनेकांनी वाहन बाहेर काढण्याचे बंद केले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?